Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; आता 20 लाखापर्यंतचे कर्ज...

दिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; आता 20 लाखापर्यंतचे कर्ज...
 

दिवाळीच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांनी गिफ्ट दिलं आहे.पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.आता तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गंत 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. या आधी या योजनेंतर्गंत 10 लाख रुपयांचे कर्ज मिळायचे मात्र आता सरकारने कर्जाची मर्यादा वाढवली आहे. छोटे व्यापारी आणि स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांसाठी याचा फायदा होऊ शकतो.

लहान व्यापाऱ्यांना होणार फायदा

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बदलामुळं मुद्रा योजनेचा उद्देश आणखी प्रभावीपद्धतीने पूर्ण होईल. या निर्णयाचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे आणि नवीन संधींचा लाभ घेण्यास मदत होईल. यामुळं रोजगारही निर्माण होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.

 

कोण घेऊ शकतं मुद्रा योजनेचा लाभ?

जे लोक नवीन बिझनेस सुरु करण्याचा विचार करत आहेत ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात. तसंच, ज्या लोकांचा आधीपासून उद्योग आहे तेदेखील त्यांचा उद्योगविस्तार करण्यासाठी या मुद्रा लोनचा वापर करु शकतात. जर तुमचा छोटा व्यवसाय असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुमच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करु शकता. (PM मुद्रा कर्ज ऑनलाईन अर्ज करू शकता).

पंतप्रधान मुद्रा योजनेचे फायदे

- या योजनेंतर्गंत कर्ज घेतल्यास व्याज दर कमी मिळते
- या योजनेंतर्गंत कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप सोप्पी होते.
- या योजनेंतर्गंत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही साक्षीदाराची गरज भासत नाही. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.