मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
मविआच्या या जाहीरनाम्याला 'महाराष्ट्रनामा' असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार- जाती जणगणनना करणार- 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत- दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार- 2.5 लाख नोकरभरती करणार- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती- शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार- सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन- अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार- बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार- एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार- महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार- महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार- महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु- शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार- सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार?
- महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार- महिलांचा बस प्रवास मोफत करणार- सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार- जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.