Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता तिरुपती मंदिरातील लाईनचे टेन्शन संपले, बदलले नियम आता 2 तासात होणार दर्शन; व्हीआयपी कोटाही संपला

आता तिरुपती मंदिरातील लाईनचे टेन्शन संपले, बदलले नियम आता 2 तासात होणार दर्शन; व्हीआयपी कोटाही संपला
 

आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथील तिरुपती मंदिरातील दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन दर्शन व्यवस्था बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत नवीन व्यवस्थेअंतर्गत भाविकांना अवघ्या 2 तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.

सध्या, तिरुपती मंदिराला भेट देण्यासाठी 20 ते 30 तास लागतात, कारण दररोज 1 लाख भाविक पोहोचतात. सप्टेंबरमध्ये तिरुपतीच्या लाडू प्रसादममध्ये भेसळयुक्त तुपाचे प्रकरण समोर आल्यानें मोठा वाद निर्माण झाला हौता. यानंतर टीटीडीने प्रसादाची व्यवस्था बदलली. त्यानंतर बोर्डाची पहिली बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मंडळाचे सदस्य जे श्यामला राव यांनी सांगितले की, विशेष प्रवेश दर्शनाचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. व्हीआयपी दर्शनाबाबत वाद् कायम असून, यावर आणखी प्रश्न उपस्थित होऊ नयेत, असे मंडळाला वाटते. दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीच्या स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था असेल. याशिवाय आता नेत्यांना मंदिर परिसरात राजकीय वक्तव्य करता येणार नाही. असे केल्यावर बोर्ड त्यांना कायदेशीर नोटीस बजावेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.