छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 38 वर्षांच्या या अभिनेत्रीचं नाव दिव्या श्रीधर आहे.
दिव्यानं 49 वर्षांच्या अभिनेत्याशी लग्न केलं आहे. आता हा नक्कीच अभिनेता आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण हा खरंच अभिनेता आहे. अनेक लोकं दिव्याचा नवरा हा बाबा असल्याचं म्हणत आहेत. या अभिनेत्याचं नाव क्रिस वेणुगोपाल आहे. क्रिस वेणुगोपाल हा मोटिवेशन्ल स्पीकर, अभिनेता आणि लेखक आहे. याशिवाय तो वकीलही आहे.
दिव्या आणि क्रिस यांनी 30 ऑक्टोबर रोजी मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर ते दोघं मंदिराच्या बाहेर येताना दिसले. त्यांचे हे लग्न इंटिमेट होतं. त्यांनी जास्त लोकांना आमंत्रित केलं नव्हतं. दिव्या यांच्या दुसऱ्या लग्नात त्यांच्या मुलांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. ते दोघं एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. तर काही नेटकऱ्यांनी दिव्याला वयानं 11 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न करण्यावरून ट्रोल केलं आहे.दिव्या विषयी बोलायचं झालं तर ती मल्याळम टिव्ही इंडस्ट्रीमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तर क्रिस आणि दिव्या श्रीधरची पहिली भेट ही 'पतरामट्टू' मालिकेच्या सेटवर झाली. काही दिवसात त्यांच्या मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं. क्रिसच्या एका नातेवाईकानं त्याला दिव्याविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेण्याचा सल्ला दिला. क्रिसला नंतर कळलं की त्याला हळू-हळू दिव्याच्या अनेक गोष्टी या आवडू लागल्या आहेत.
क्रिस वेणुगोपालनं त्यानंतर दिव्या श्रीधरला लग्नासाठी प्रपोज केलं. दिव्या आधी होकार द्यायचा की नाही हा विचार करत होती. मात्र, त्यानंतर लगेच दिव्यानं त्याच्या लग्नाच्या प्रपोजलला होकार दिला. त्यानंतर दोघं आता लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थित गुरुवयूर लग्न केलं. दिव्यानं मल्याळम आणि तमिळ मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली आहे.
लग्नाच्या प्रपोजलविषयी बोलताना दिव्या म्हणाली, "सगळ्यात आधी मला वाटलं की क्रिस माझ्याशी फ्लर्ट करायचा. मला वाटलं की तो मस्करी करतोय. पण नंतर मला कळलं की लग्नाला घेऊन तो खरंच बोलतोय आणि त्याला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे."दिव्याचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नातून तिला दोन मुलं आहेत. क्रिसशी लग्न करण्याआधी दिव्यानं तिच्या दोन्ही मुलांना याविषयी काय वाटतं हे जाणून घेतलं की त्यांना तिनं दुसरं लग्न केलं तर चालणार आहे का? दिव्यानं सांगितलं की "तिच्या मुलीनं सांगितलं की आई, जर तू माझ्यासोबत आहेस तर तू दुसरं लग्न करत असशील तर माझी काही हरकत नाही. ती आता खूप आनंदी आहे आणि तिचे वडील खूप चांगले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.