सांगली,दि. १६ : जुनी इनाम धामणी या गावाने मला नेहमीच भक्कम पाठबळ दिले आहे. या गावात अनेक विकास कामे केली आहेत. यापुढेही या गावाला विकास कामाच्या बाबतीत पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. जुनी इनाम धामणी येथे आज आमदार गाडगीळ यांची प्रचार फेरी मोठ्या उत्साहात निघाली होती. त्यावेळी ते बोलत होते.
जुनी धामणी येथे सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन केले होते. प्रचार फेरीत महिला आणि पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत दादांचे गावात स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात झाली.
प्रचार फेरीच्या प्रारंभी माजी उपसरपंच नंदाताई सूर्यवंशी म्हणाल्या, या गावात विकासासाठी शासनाकडून एवढा निधी मिळतो आणि त्यासाठी आमदार पुढाकार घेतात हेच आम्हाला पूर्वी माहीत नव्हते. सुधीरदादा आमदार झाल्यामुळे ते आम्हाला समजले. त्यांच्यामुळे आमच्या गावात मोठ्या प्रमाणात विकास निधी आला. अनेक कामेही पूर्ण झाली. विकास काय असतो ते आम्हाला सुधीरदादांनी दाखवून दिले आहे.
नंदाताई सूर्यवंशी म्हणाल्या, या गावासाठी दादांनी एवढे काम केले आहे की त्यांना गावातून जोरदार मतदान होणार आहे. दादा तिसऱ्यांदा आमदार झाले पाहिजेत अशीच ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे. त्या म्हणाल्या,पुराच्या वेळी ग्रामस्थांना सुखरूप बाहेर पडता यावे यासाठी जुनी धामणी वस्ती ते अंकली मुख्य रस्ता काम त्यांनी मंजूर केले. गावातील मुख्य रस्ता महामार्गापर्यंत केल्यामुळे वाहतूक वाढली आहे. कृष्णा नदीवरील घाटाला पूरस संरक्षक भिंतीची मंजुरी मिळाली आहे. पाईपलाईन, रस्ते आणि गटारी अशी कामे केल्यामुळे गावाचा कायापालट झाला आहे.
प्रचार फेरीच्या वेळी दादांनी जैन मंदिरात दर्शन घेतले. तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. मंदिरासाठी त्यांनी निधी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. ग्रापंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, कृषी मंडळ सदस्य धीरज पाटील, सतीश सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी माजी सरपंच अण्णासाहेब चौगुले, माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी, अक्षय भगीरे, शितल कोळी, रोहित शेडबाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
फोटो
1) सांगली :जुन्या धामणी गावात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची जुन्या धामणी गावात मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागाने प्रचार फेरी काढण्यात आली.
3) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची जुन्या धामणी गावात उत्साहात प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.