Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉम्रेड शंकर पुजारी यांचा अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना जाहीर पाठिंबा

कॉम्रेड शंकर पुजारी यांचा अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना जाहीर पाठिंबा 


सांगली:  सांगली विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार, महिला संघटनेच्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील  या निवडणुकीतील सक्षम उमेदवार आहेत म्हणून जयश्री मदन पाटील यांना बांधकाम कामगार आणि महिला संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत असे कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले.

आमच्या संघटनेत असणाऱ्या बेघर महिला, शेतमजूर, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार या सर्वांच्या मते या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना पाठिंबा द्यायचे ठरले आहे. कामगार संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार महायुतीचा पराभव व्हावा यासाठी जयश्री मदन पाटील या सक्षम उमेदवार आहेत.
 
महायुती माहिती सरकारने कामगार विरोधी धोरणे राबवली आहेत. 29 कामगार कायदे रद्द केले आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या कामगारांच्या विरोधात आहे.  महायुती  सरकार हे फक्त मुठभर लोकांच्या साठीच काम करत आहे.
सांगली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचा पराभव फक्त जयश्री मदन पाटील याच करू शकतात म्हणून या संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.  अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी यापूर्वी महापालिका क्षेत्रात फार मोठे काम केलेले आहे. यापुढेही त्या अशाच प्रकारे काम करत राहतील असा विश्वास बांधकाम कामगार संघटना आणि महिला संघटना यांना  असल्यामुळे जाहीर पाठिंबा दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.