विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून शेवटच्या काळात प्रचाराचा धडाका सुरू आहे.
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. नुकताच शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबतचे संकेत दिले. त्यावरून भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेवरून सदाभाऊ खोत यांनी खिल्ली उडवली.
'इस्लामपुरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून काहीजण भावनिक राजकारण करत आता संधी आल्याचे सांगत आहेत. पण तिथे मुख्यमंत्री व्हायला १४५ गडी लागतात. तिथे काय छप्पराला मेडक द्यायचे का?', असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवली तसंच त्यांच्यावर टीका देखील केली. सदाभाऊ खोत यांच्या चर्चेवर आता जयंत पाटील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे ठरेल.
शरद पवारांना मी सोडलं नाही.., अजित पवारांचे बारामतीत मोठं विधान'आमच्या लाडक्या बहिणीमुळे महायुतीला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीचे सरकार येईल.' असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी निशिकांत भोसले पाटील यांना आमदार बनवण्यासाठी आम्ही सगळे एक झालो, असे त्यांनी सांगितले. तसंच, निशिकांत पाटील आमदार होणार आहेत आणि ते आमदार झाल्यावर मी नामदार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.