Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार, कुणाला किती जागा मिळणार ?

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार, कुणाला किती जागा मिळणार ?
 

महाराष्‍ट्र विधानसभेसाठी 288 जागांवर आज (बुधवारी) मतदान पार पडले. सहा वाजेपर्यंत ६० टक्केंच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज आहे. २३ नोव्हेंबर रोजी ईव्हीएम उघडल्यानंतर राज्यात कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे.

त्याआधी आज एक्झिट पोल समोर आले आहेत. MATRIZE च्या एक्झधिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. महायुतीला १५० ते १७० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाविकास अघाडीला 110 ते 130 जागा मिळू शकतात. तर अन्य आठ ते दहा जागांवर निवडून येतील.

कोणत्या पक्षाला किती जागा?

MATRIZE एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. त्यांना 89 ते 101 जागा मिळू शकतात. शिंदे गटाला 37 ते 45 जागा मिळू शकतात. तर अजित पवारांना 17 ते 26 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे. काँग्रेसला 39 ते 47 जागा, शिवसेनेला (यूबीटी) 21 ते 29 जागा आणि शरद पवार यांच्या पक्षाला 35 ते 43 जागा मिळू शकतात.

कुणाला किती टक्के मतदान ?
महाराष्ट्रात महायुतीला ४८ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात ४२ टक्के मते मिळू शकतात. दहा टक्के मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
मॅट्रिझ एक्झिट पोल काय सांगतो? कुणाला किती जागा ?

भाजप - ८९ - १०१

शिंदे शिवसेना - ३७-४५

राष्ट्रवादी अजित पवार - १७-२६

काँग्रेस ३९ - ४७

ठाकरे गट - २१-१९

राष्ट्रवादी शरद पवार गट - ३५-४३

महायुती - १५०-१७०

मविआ - ११० -१३०

इतर - ८ - १०

कुणी किती जागांवर निवडणूक लढवली ?
महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक 149 जागांवर निवडणूक लढवली आहे. शिंदे गटातील शिवसेनेने ८१ जागांवर तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ५९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने 101 जागांवर, उद्धव गटाच्या शिवसेना (यूबीटी) 95 जागांवर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (एसपी) 86 जागांवर उमेदवार आहेत.

नोट - वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.