हरिपूरचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणार :, सुधीरदादा गाडगीळ
सुधीरदादा गाडगीळ; गावात उत्साहात प्रचारफेरी
सांगली, दि. १४ : वारणा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावरील हरिपूर या ऐतिहासिक गावाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठीचा आराखडा मी शासनाला सादर करणार आहे. त्याची सुरुवात झाली आहेच, यापुढे अधिक निधी उपलब्ध करून एक अव्वल दर्जाचे प्रसिद्ध असे पर्यटन क्षेत्र येथे विकसित करू, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
आमदार गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आज हरिपूर येथे प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद तांबवेकर, सरपंच राजश्री तांबवेकर, युवराज बोंद्रे , महेश बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
हरिपूर येथे स्वागत कमानीजवळ सुधीरदादांचे आगमन झाल्यावर फटाक्यांच्या आकाशबाजीत आणि ढोलताशाच्या साथीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत दादांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रत्येक घरी महिला त्यांचे औक्षण करीत होत्या.
संभाजी मित्र मंडळ, कृष्णा माता मित्र मंडळ, वंदे मातरम मित्र मंडळ ,भोईराज मित्र मंडळ,विजयंता मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, स्टार मित्र मंडळ , अजिंक्य शिवा मित्र मंडळ, शिंदे वाडा, रणझुंजार मित्र मंडळ, मोरेश्वर मित्र मंडळ अशा प्रमुख प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी निघाली. प्रचार फेरीच्या वेळी नागरिकांना भेटत होते त्यांच्याशी बोलत होते.
सरपंच राजश्री तांबवेकर,
उपसरपंच कोमल सूर्यवंशी,
ग्रामपंचायत सदस्य शर्वरी रांजणे अभ्यंकर, संभाजीतात्या सूर्यवंशी, युवराज बोंद्रे, महेश बोंद्रे (सरकार), दिग्विजय बोंद्रे, गणपती साळुंखे,
आशिष अभ्यंकर, सतीश खंडागळे, विकास हणबर, महेश हणबर,
सचिन तांबवेकर, स्नेहलता पवार,
रामचंद्र पवार, अरविंद खंडागळे, परशुराम बावधनकर तसेच यांच्याबरोबर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
फोटो
1) सांगली: हरिपूर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
2) सांगली: हरिपूर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचार फेरीस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
3) सांगली: हरिपूर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारफेरीच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलावर्ग.
4) सांगली: हरिपूर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचार फेरीच्या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.