सांगली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आठ विधानसभा मतदारसंघात जवळपास ४८.३९ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ५४.४८ तर शिराळा मतदारसंघात ५४.४१ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात २५ लाख ३६ हजार ६५ मतदानापैकी सकाळी ११:०० वाजेपर्यंत १८.५५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान इस्लामपूर मतदारसंघात ५४.८४ टक्के तर शिराळा मतदारसंघात ५४.४१ टक्के मतदान झाले आहे. सांगली, मिरज शहरातील मतदान केंद्रावर दुपारीही मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे.
मिरज मतदारसंघात ४३.९८, तर सांगली विधानसभा मतदारसंघात ४३.८६ टक्के मतदान झाले आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांमध्ये चुरस असल्यामुळे येथेही ५४.४१ टक्के मतदान झाले आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सकाळीच कुटुंबीयासह मतदान केले आहे. आठ विधानसभा मतदारसंघातील ९९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास १८.५५ टक्के मतदान झाले असून सांगली शहरात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. इस्लामपूर मतदारसंघात सर्वाधिक २२.२६ टक्के मतदान झाले आहे.जिल्ह्यातील आठपैकी सांगली, खानापूर व जत मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये सांगली मतदारसंघात काँग्रेसमध्ये, खानापूरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणि जतला भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश देऊन त्यांना महायुतीची उमेदवारी दिली.
तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पाटील यांच्याविरोधात भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लढत होत आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातही डॉ. विश्वजीत कदम यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्याशी एकास एक थेट लढत होत आहे. जिल्ह्यातील आठपैकी मिरज मतदारसंघाचा अपवाद वगळता सात मतदारसंघांत तुल्यबळ लढती असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे
मिरज - ६.३२सांगली - ७.६इस्लामपूर - ८.१३शिराळा - ६.२९पलूस कडेगाव - ४.७७खानापूर - ४.७१तासगाव कवठेमहाकाळ - ६.३७जत - ४.९४सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणेमिरज १७.७सांगली १९.६इस्लामपूर २२.२६शिराळा २०.४९पलूस-कडेगाव १७.३४खानापूर १६.२५तासगाव-कवठेमहांकाळ १८.६७जत १६.५२३ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणेमिरज - ४३.९८सांगली - ४३.८६इस्लामपूर - ५४.८६शिराळा - ५४.४१पलूस-कडेगाव - ५०.६६खानापूर - ४६.६३तासगाव-कवठेमहांकाळ - ४९.६३जत - ४५.९४
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.