Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीची व्यापारपेठ समृद्ध बनवू सुधीरदादा गाडगीळ; व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक

सांगलीची व्यापारपेठ समृद्ध बनवू सुधीरदादा गाडगीळ; व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक
 

सांगली, दि.13: सांगली शहरासह माझ्या मतदारसंघातील सर्व व्यापाऱ्यांनी मला सातत्याने पाठिंबा आणि पाठबळ दिले आहे. त्या बळावरच  सांगलीची बाजारपेठ आणखी समृद्ध करू, असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.
 
येथील कापड पेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक झाली. फटाक्यांच्या आतषबाजीत सुधीरदादांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.सुरुवातीस त्यांनी श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतले.  रवींद्र बिनीवाले म्हणाले, सुधीरदादा यांनी  सांगलीसाठी प्रचंड निधी आणलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की यावेळी त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी करायचे आहे.
 
गुरुनाथ कुलकर्णी म्हणाले, सुधीरदादा यांनी सांगलीत अनेक विकासकामे केली आहेत. तसेच वेळोवेळी व्यापाऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळे सुधीरदादा यांना बहुमताने निवडून आणायचे असा निर्णय आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने घेतला आहे.
नितीन खडीलकर   सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व कसे प्रगट होते ते सुधीरदादांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व सांगलीकरांनी आपला माणूस म्हणून सुधीरदादा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे. 

श्रीगोपाळ सारडा, मनोज भिडे, नितीन खाडीलकर, श्यामसुंदर सारडा, कुंभोजकर, रमेश गंगवानी, शैलेश केळकर, अमृत पतंगे, राजाभाऊ पडसलगीकर, श्रीराम पडियार, अमित मालाणी, रवींद्र जाखोटिया, बापूसाहेब गोरे,  पंढरीनाथ कुलकर्णी तसेच सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो 
 
1) सांगली :कापड पेठेतील श्री बालाजी मंदिरात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दर्शन घेतले.
2) सांगली: प्रचार बैठकीच्या वेळी कापड पेठेतील व्यापाऱ्यांसमवेत आमदार सुधीरदादा गाडगीळ. 
3) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ कापड पेठेत व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी बोलताना आमदार सुधीर दादा गाडगीळ.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.