Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महागाईनं दिवाळीत दिवाळं काढलं.. महायुती शासन म्हणजे लाडक्या बहिणीचं मरणच:-विजया पृथ्वीराज पाटील


महागाईनं दिवाळीत दिवाळं काढलं.. महायुती शासन म्हणजे लाडक्या बहिणीचं मरणच --- विजया पृथ्वीराज पाटील
 

सांगली दि. १४:छ. शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा सन्मान व्हायचा.. शिवबांच्या लाडक्या बहिणी सुखी होत्या. आता शिवबांच्या नावाचा राजकीय फायदा लाटणाऱ्या महायुती शासनाच्या राज्यात दिवसा ढवळ्या जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. माऊलींच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारुन लंपास केले जात आहेत. आणि अशा घटना घडताना महायुती शासन व सांगलीचे आमदार मूग गिळून गप्प आहेत. महागाईच्या वणव्यात दिवाळीत दिवाळं निघालं.. लेकरांना गोडधोड खायला घालायची ऐपत नसलेली बहिण लाडकी कसली? हे सारं निवडणुकीत मतं मिळवायचं ढोंग आहे. 
 
आता महिलांना हे कुटील कारस्थान समजून आलं आहे. सांगलीकर बहिणी, महिला आता या कपटी सरकारला मतदानातून धडा शिकवणार आहेत. आज शिंदे सरकारच्या राज्यात महिला बिलकुल सुरक्षित नाहीत. सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाले. आमदार कांहीच करत नाहीत. आया बहिणीची अब्रू लुटताना बघ्याची भूमिका घेणारा आमदार काय कामाचा.. त्याला आता घरी बसवायचा निर्णय पृथ्वीराज पाटील यांच्या लाडक्या बहिणींनी घेतला आहे.२० नोव्हेंबरला पृथ्वीराज पाटील यांच्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा चंग महिलांनी बांधला आहे असे प्रतिपादन विजया पृथ्वीराज पाटील यांनी केले. त्या कर्नाळ रोड, पसायदान शाळा कर्नाळ रोड, हरीपूर येथील महिलांच्या बैठकीत बोलत होत्या. 

त्या पुढे म्हणाल्या, 'महापुरात लाडक्या बहिनींचा संसार गाडीत भरुन निवारा केंद्रात भोजन व निवास व्यवस्था करणारा पृथ्वीराज पाटील हा खरा लाडका भाऊ आहे. कोरोना काळात अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकू सुरक्षित ठेऊन संसार वाचवलेला पृथ्वीराज पाटील यांना सांगलीत प्रचंड मोठा पाठिंबा दिला व आशीर्वाद आहे. त्यांनाच निवडून आणणार असा चंगच लाडक्या बहिणींनी बांधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि लाडक्या बहिणींना रु. ३०००मिळणार आहेत. शिकून बेकार असलेल्या पदवीधर मुलींना रु. ४०००बेरोजगार भत्ता आम्ही देणार आहे.'
यावेळी प्रियांका पाटील, आशा पाटील, ज्योती आदाटे, नूतन पवार, ज्योती सुर्यवंशी, सुवर्णा पाटील, किर्ती देशमुख, आश्विनी व परिसरातील महाविकास आघाडीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.