सांगली : दिवाळी सणाचे औचित्य साधून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज कोल्हापूरजवळील श्रीक्षेत्र ज्योतिबा येथे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे मनोभावे दर्शन घेतले. देवस्थान समितीतर्फे सुधीरदादांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं' असा गजर दादांनी केला.
यावेळी उपस्थित भाविकांबरोबरही सुधीरदादांनी संवाद साधला. गुलालाची उधळण होत असलेल्या वातावरणात त्यांनीही श्री ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करीत समस्त सांगलीकर जनतेला सुख आणि समृद्धी मिळो अशी प्रार्थना केली. देवाला साकडे घातले आणि आशीर्वाद घेतले.
दिवाळीच्या दिवसातच श्री ज्योतिबाचे दर्शन झाल्याने सुधीरदादा आणि त्यांच्याबरोबरचे सर्व नेते, कार्यकर्ते भारावून गेले होते. श्री जोतिबाचा आशीर्वाद मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. श्री ज्योतिबा यांच्या दर्शनानंतर दादांनी काळभैरव तसेच यमाईमाता यांचेही दर्शन घेतले. त्यांच्यासोबत विश्वजीत पाटील, अतुल माने,किरण भोसले, अमित देसाई, युवराज बावडेकर, महेंद्र पाटील, श्रीकांत शिंदे, रमाकांत चितळे, वाले यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
सांगली : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिवाळीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र ज्योतिबा येथे जाऊन आज दर्शन घेतले. सांगलीकरांच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी देवाला साकडे घातले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.