Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशाची लुट करणाऱ्या भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच हद्दपार केल्या शिवाय गप्प बसणार नाही - जयश्री मदन पाटील

देशाची लुट करणाऱ्या भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच हद्दपार केल्या शिवाय गप्प बसणार नाही - जयश्री मदन पाटील 

 
बुधगांव :- धर्माच्या नावाखाली जातीपातीचे कुटील राजकारण करून समाजा - समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपाकडुन देशात  सुरु आहे. वाढत्या महागाई च्या दृष्टचक्रात सामान्य जनता उद्योजक आणि शेतकरी वर्ग भरडून गेला आहे . देशाची घटनाच बदलून हुकुमशाही पध्दतीने राजकारण सुरु आहे . त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भाजपाबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध जनता अशी लढत होऊन देशाची लुट करणाऱ्या भाजपाला जनताच हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे बुधगांव  येथील  श्री सिध्देश्वर मंदीर मध्ये अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील बोलताना म्हणाल्या.

बुधगांव येथे अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ  श्री सिध्देश्वर मंदीर येथे जयश्री  पाटील , युवा नेते हर्षवर्धन पाटील व  गावातील प्रमुख नागरिकांच्या  उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात  करण्यात आली. 

सध्या सरकारने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली आहे .शेतकऱ्यांना एका बाजूला पेन्शन द्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांच्या खतांचे डिझेलचे आणि शेती अनुषंगिक वस्तूंचे दर वाढून जीएसटी च्या माध्यमातून त्यांची लूट करायची हाच धंदा या सरकारने सुरू केला आहे .त्यामुळे या नीतीने देशातील शेतकरी  उद्योजक  देशोधडीला लागला आहे . विकास कामाचा डांगोरा पेटवत भाजप सरकारने दहा वर्षात देशाचे कर्ज वाढवण्याचे पाप केलं .येणारा काळ हा धोकादायक काळ आहे .सुज्ञ जनतेने सावध होऊन देशातील सामान्य जनता शेतकरी उद्योजक  युवा पिढी यांच्या माध्यमातून  बदल घडवुया येत्या 20 नोव्हेंबर रोजी हिरा या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल यांनी केले . 

यावेळी श्री सिध्देश्वर मंदीर , गणेश मंदीर , चर्च , बुध्दविहार, गुडुंबुवा महाराजांच मठ, स्वामी समर्थ मंदीर , व आदी स्थळाना भेट देऊन आशिर्वाद घेतला,  तसेच गावातील विविध भागामध्ये जावुन नागरिकांची व कार्यकर्त्यांची समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्याचा संकल्प केला. यावेळी मी सक्षमा फाऊंडेशनच्या सदस्या गिताजंली पाटील,  ग्रामपंचायत सदस्या शुभांगी शिंदे,  वनिता पाटील,  उज्वला पाटील,  अर्पणा सुर्यवंशी , माजी. सरपंच  सुजाता पाटील, सविता पाटील,  माजी पंचायत समिती सदस्य वनिता ,  तंटमुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील,  सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील,  माजी उपसभापती प्रविण पाटील, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल,  माजी उपसरपंच श्रीकांत पाटील, उद्योजक अविनाश पाटील, अधिक पाटील,  धैर्यशील देसाई,  प्रशांत मोहिते , रणजित पाटील,  संदीप पवार , कुलदीप पाटील, शिवसेनेचे रामदास पाटील,  धोंडीराम पाटील, अशोक शिंदे, अरविंद पाटील, माजी सरपंच गणेश पाटील ,  हणमंत कदम,  सुखदेव गोसावी,  राजेंद्र शिवकाळे, अविनाश पाटील, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विजय पाटील, संदीप पाटील,  नजीर मुलाणी,  सुरेश ओंकारे,  अरुण बंडगर,  , संग्राम पाटील,  निलेश पाटील,  प्रभाकर पाटील,  सचिन पाटील, सचिन आवळे ,  आप्पासो पाटील, प्रशांत होवाळे,  शेखर पाटील , मदनभाऊ युवा मंच चे  शेखर पाटील,  राजेद्र शिवकाळे, प्रविण बंडगर , रफिक हवालदार,  विष्णु वसवाडे,  संदीप गोसावी , पी के इंगळे, फिरोज शेरकर , महेश देवकुळे,  अजित आवळे, तेजस मोरे,  अनिल आवळे यांच्यासह गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.