एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या ४० बंडखोरांचं काय झालं? किती जिंकले, किती पडले? वाचा संपूर्ण यादी
जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
तसेच त्यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. नंतर या महायुतीत अजित पवारांच्या गटानेही प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी-शरद पवार) असा संघर्ष होईल असं बोललं जात होतं. एक्झिट पोल्समध्ये देखील असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, महायुतीने या निवडणुकीत सोपा विजय मिळवला आहे. महायुतीने सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीची गाडी ६० जागांच्या पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीच्या नेत्यांची कॉलर टाईट झाली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या ४० आमदारांचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकनाथ शिंदेंबरोबर मुंबई सोडून, सुरत व नंतर गुवाहाटीला गेलेले व तिथून परत मुंबईत येऊन थेट सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या ४० आमदारांपैकी किती जणांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं होतं, त्यापैकी किती जण जिंकले व किती जण पराभूत झाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
बंडखोरांचे निकाल
उमेदवाराचं नाव निवडणुकीचा निकाल
1) एकनाथ शिंदे (मंत्री) विजयी
2) अनिल बाबर मुलगा सुहास बाबर यांना उमेदवारी दिली (विजयी)
3) शंभूराजे देसाई (मंत्री) विजयी
4) महेश शिंदे आघाडीवर
5) शहाजी पाटील आघाडीवर
6) महेंद्र थोरवे विजयी
7) भरतशेठ गोगावले विजयी
8) महेंद्र दळवी विजयी
9) प्रकाश अबिटकर विजयी
10) डॉ. बालाजी किणीकर विजयी
11) ज्ञानराज चौगुले पराभूत
12) प्रा. रमेश बोरनारे विजयी
13) तानाजी सावंत विजयी
14) संदीपान भुमरे (मंत्री) खासदार झाले
15) अब्दुल सत्तार आघाडीवर
16) प्रकाश सुर्वे विजयी
17) बालाजी कल्याणकर विजयी
18) संजय शिरसाठ विजयी
19) प्रदीप जयस्वाल विजयी
20) संजय रायमुलकर पराभूत
21) संजय गायकवाड विजयी
22) विश्वनाथ भोईर विजयी
23) शांताराम मोरे विजयी
24) श्रीनिवास वनगा तिकीट नाकारलं
25) किशोरअप्पा पाटील पराभूत
26) सुहास कांदे विजयी
27) चिमणआबा पाटील मुलगा अमोल पाटील यांना उमेदवारी दिली (विजयी)
28) सौ. लता सोनावणे विजयी
29) प्रताप सरनाईक विजयी
30) सौ. यामिनी जाधव पराभूत
31) योगेश कदम विजयी
32) गुलाबराव पाटील (मंत्री) विजयी
33)राजेंद्र यड्रावकर विजयी
34) मंगेश कुडाळकर विजयी
35) सदा सरवणकर पराभूत
36) दीपक केसरकर विजयी
37) दादा भुसे (मंत्री) विजयी
38) संजय राठोड विजयी
39) उदय सामंत (मंत्री) विजयी
40) मंजुळा गावित विजयी
पाच बंडखोर आमदार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.