Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाष्टा करताना ठसका लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू; श्वसननलिका दबली, उलटी होऊन बेशुद्ध झाले अन्..

नाष्टा करताना ठसका लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू; श्वसननलिका दबली, उलटी होऊन बेशुद्ध झाले अन्..
 

कोल्हापूर :- इस्लामपूरमधील  सोयाबीन प्रक्रिया कारखान्याबाहेर नाष्टा करताना ठसका लागल्याचे निमित्त झालेल्या तानाजी बळीराम कदम (वय ५७, रा.मसुचीवाडी, ता. वाळवा) यांचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. २५ ऑक्टोबरला इस्लामपूरमध्ये ही घटना घडली होती. 

ठसका रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची श्वसननलिका दबल्याने मागील सोळा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. याची नोंद सीपीआर पोलिस  चौकीत झाली. तानाजी कदम हे इस्लामपूरमधील कारखान्यात नोकरीला होते. कारखान्याबाहेरील हॉटेलमध्ये ते नाष्टा करण्यासाठी आले होते. नाष्टा करताना त्यांना ठसका लागला. तो रोखण्याच्या प्रयत्नात त्यांना उलटी होऊन ते बेशुद्ध झाले.

त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता ठसका रोखण्यामध्ये त्यांची श्वसननलिकाच दबल्याचे डॉक्टरांकडून  समजले. प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने सहा नोव्हेंबरला त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातू असा परिवार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.