राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली.
या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना आगीच भडका उडाला. चंदगड तालुक्यातील महागाव येथे शिवाजी पाटील यांचं काही महिला औक्षण करत असताना मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्याने आगीचा भडका उडाला.
नेमकं काय घडलं?
महिला औक्षण करत असताना जेसीबीने शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकण्यात येत होता. आगीच्या भडक्यात काही महिला आणि आमदार शिवाजी पाटील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आहे. आगीच्या भडक्यात नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.