राज्यात आता लवकरच महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे महायुतीमधील तीन घटक पक्षातील हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु आहे.
त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे व कोणती खाते येणार यावरून रस्सीखेच पहावयास मिळत असतानाच दुसरीकडे मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दर्शविला तर शिवसेनेतील सध्या 'या' पाच नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांना आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार यात आता शंका नाही. पण मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का, हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का ? याची उत्सुकता लागली आहे.
सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदे हे अनुकूल नसल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात शिंदे शिवसेना कोणाकडे जबाबदारी देणार याची चर्चा सुरू झाली आहे. आता उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे हे पाच नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे येत्या काळात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची उत्सुकता लागली आहे.
महायुतीकडून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठका देखील झाली. याच अनुषंगाने गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यावर आता उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर शिंदेंकडून स्वीकारली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, अशी त्यांच्या काही नेत्यांची इच्छा आहे. तसे काही नेत्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले. मात्र, त्यांनी हे पद घेतले नाही तर त्यांचे चिरंजीव व खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर ते त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडे ते हे पद सोपवू शकतात का? तशी शक्यता आहे का? अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरु आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीवेळी एकनाथ शिंदे यांना मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे व भरत गोगावले यांनी साथ देत महत्वाची भूमिका बजावली होती. शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर, यांच्यापैकी कोणावरही ते विश्वास दाखवू शकतात, असे बोलले जात आहे. दरम्यान, जळगाव ग्रामीणचे आमदार असलेले गुलाबराव पाटील यांचेही नाव या शर्यतीत आहे. पाटील यांच्या मतदारसंघात 'संभाव्य उपमुख्यमंत्री' असे पोस्टरही लावण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व नावाची चर्चा सध्या सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.