सांगली, दि.७ : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील शामरावनगर आणि सर्व परिसराचा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात कायापालट केला आहे. त्यामुळे हा सर्व परिसर त्यांच्याच पाठीशी १००टक्के उभा राहणार आहे, अशी ग्वाही महिलांनी प्रचार मेळाव्यात दिली. 'दादा त्यांनी आम्हाला फसवलं पण तुम्ही आम्हाला वसवलं ' असे फलक हातात घेऊन महिला कार्यक्रमस्थळी सुधीरदादांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या निनादात सुधीरदादांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी पंचारतीने ओवाळून त्यांना औक्षण केले.
शामरावनगरमधील सिंधी सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित या महिला मेळाव्यास रामनगर, भारतनगर, रुक्मिणीनगर ,शामरावनगर, विनायकनगर, हनुमाननगर यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या सर्वांनी महायुती शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक केलेच; पण त्याचबरोबर सुधीरदादांनी गेल्या दहा वर्षात या भागाचा कायापालट केला असे आवर्जून सांगितले.
अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.त्यांनी सांगितले की, दादा आम्हाला पूर्वी त्यांनी फसवले होते ;परंतु तुम्ही आम्हाला वसवले आहे. पूर्वी आम्हाला चिखलातून आणि डबक्यातून रस्ता शोधावा लागत होता. अत्यंत प्रतिकूल अशा ठिकाणी तुम्ही रस्ते बनवले. त्यामुळे आम्हाला आमच्या घरापर्यंत चालत जाणे शक्य झाले.नाही तर पूर्वी घरी जाणेसुद्धा अवघड असायचे. दादा तुम्ही केलेल्या कामाच्या खुणा प्रत्येक शंभर मीटरवर कार्यफलकाच्या रूपाने झळकत आहेत.
या संपूर्ण परिसरासाठी गेल्या दहा वर्षात ८२ कोटी रुपये दादा तुमच्यामुळे शासनाकडून मिळाले आहेत. आणखी जे काही प्रश्न शिल्लक असतील ते तुम्हीच सोडवाल याची आम्हाला खात्री आहे, असाही विश्वास महिलांनी व्यक्त केला.काही महिलांनी सांगितले की सुधीरदादांच्या सततच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळेच हनुमाननगर परिसरात आता शासनाच्या आणि महापालिकेच्या वतीने सुसज्ज नाट्यगृह होत आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत. त्यामुळे या भागाचा पूर्ण कायापालट होणार आहे.भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी सुधीर दादांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या विजयाची हॅट्रिक आपल्याला करायची आहे. त्यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सौ.मंजिरीताई गाडगीळ,भाजप नेत्या नीता केळकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
महिलांनी व्यक्त केलेल्या उत्स्फूर्त मनोगताबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुधीरदादांनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले, शामरावनगर आणि परिसरातील समस्या आव्हान समजून मी गेल्या दहा वर्षात काम केले. येथील कार्यकर्ते तसेच नागरिक- विशेषत: महिला यांच्या पाठिंब्यामुळेच मी या भागात काम करू शकलो. आपल्याला पुढच्या पाच वर्षात शामरावनगर आणि सर्व परिसर पूर्ण समस्यामुक्त करायचा आहे. त्या दिशेनेच यापुढे आपण काम करीत राहणार आहोत. शैलेश पवार,सुमित शिंदे, रोहित बाबर, रोहित जगदाळे, राजू नलवडे, अमर पडळकर, शहाजी भोसले परिसरातील महिलांनी या मेळाव्याचे संयोजन केले.
सांगली: प्रभाग क्रमांक १८ मधील शामरावनगर येथे आयोजित महिला मेळाव्यात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे महिलांनी पंचारतीने ओवाळून स्वागत केले.२)सांगली :प्रभाग क्रमांक १८ मधील शामरावनगर येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.