कोलकाता : आजकाल अनेकजण वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. कारण वजन कमी करणं हा मोठा टास्क असतो. त्यासाठी अनेक आवडते पदार्थ नुसते पाहूनच मन भरावं लागतं. परंतु तुम्हाला माहितीये का, यावर रामबाण उपाय हा आपल्या किचनमध्येच असतो.
हिंगाच्या फोडणीचा अगदी घरभर घमघमाट पसरतो. नुसत्या सुगंधानंच पदार्थ खावासा वाटतो. खरंतर हिंग केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स असतात. डॉक्टर सांगतात की, हिंगाचं पाणी पिणं शरिरासाठी सर्वोत्तम ठरतं. या पाण्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं, अन्नपचन व्यवस्थित होतं, त्वचेवर तेज येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होऊ शकतं. डॉक्टरांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मेटाबॉलिज्म वाढतं!
आयुर्वेदिक विशेषज्ज्ञ डॉक्टर असीम शर्मा यांनी सांगितलं की, हिंगाच्या पाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज हिंगाचं पाणी प्यायल्यानं शरिरात मेटाबॉलिज्म वाढतं. तसंच अन्नपचन सुरळीत होतं. बद्धकोष्ठता दूर होते आणि अपचनही होत नाही. मेटाबॉलिज्म वाढल्यानं कॅलरी बर्न होतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तसंच या पाण्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं.
त्वचेसाठी फायदेशीर!
हिंगाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवर छान तेज येतं. पिंपल, रॅशेस दूर होतात. तसंच हिवाळ्यात त्वचेवरील ओलावा टिकून राहतो.
फुप्फुसांसाठी फायदेशीर!
हवामान बदलताच सर्दी, खोकला होतो. ज्याचा परिणाम फुप्फुसांवर होऊ शकतो. त्यामुळे हिंगाचं पाणी प्यावं, ज्यामुळे फुप्फुसं निरोगी राहतात. तसंच श्वासासंबंधी त्रास दूर होतो.
पीरियड्स पेन आणि डोकेदुखीवर आराम!
अनेक महिलांना पीरियड्सदरम्यान अर्थात मासिकपाळीत खूप त्रास होतो. पोट असह्य दुखतं. या दुखण्यासह डोकेदुखीवरही आराम मिळू शकतो.
हृदय आणि ब्लड शुगरसाठी फायदेशीर!
हिंगाच्या पाण्यामुळे शरिरात रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. तसंच दररोज हे पाणी प्यायल्यानं हृदयरोग आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रित राहतं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी सांगली दर्पण जबाबदार नसेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.