Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैष्णोदेवी रोपवेला जोरदार विरोध; दुकानदार, कामगारांची निदर्शने

वैष्णोदेवी रोपवेला जोरदार विरोध; दुकानदार, कामगारांची निदर्शने
 

जम्मू : जगभरातील हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी येथे भाविकांच्या सोयीसाठी 'रोपवे' उभारण्याचा निर्णय श्री वैष्णोदेवी मंडळाने घेतला आहे. या निर्णयाला स्थानिक दुकानदार, कामगारांनी जोरदार विरोध करून निदर्शने सुरू केली आहेत. 

रोपवे तयार झाल्यास आम्ही बेरोजगार होऊ, अशी या दुकानदारांची भावना आहे. हे सर्व दुकानदार व कामगार कटरा येथील शालीमार पार्क व उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. हे दुकानदार व कामगार तीन दिवसांपासून संपावर आहेत. 

श्री माता वैष्णोदेवी मंडळाने २५० कोटी रुपये खर्च करून ताराकोटे मार्ग ते सानजी छाट या १२ किमी मार्गावर रोपवे उभारण्याचे ठरवले आहे. या रोपवेच्या विरोधात आंदोलक शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. हा प्रस्ताव मागे घ्यावा किंवा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वैष्णोदेवी मार्गावरील अनेक दुकाने सलग तिसऱ्या दिवशीही बंद होती. घोडे व पालखीवाले यांनी आपली सेवा भाविकांसाठी बंद ठेवली. त्यामुळे भाविकांचे हाल होत आहेत. शिवसेनेचे (उबाठा) जम्मू-काश्मीर प्रमुख मनीष साहनी हेही आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. या रोपवेमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. तसेच भाविकांना सेवा देणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. काँग्रेसचे नेते व कामगार संघटनेचे अध्यक्ष भूपिंदर सिंग जमावाल म्हणाले की, सरकारने प्रत्येक कामगाराचे पुनवर्सन करावे. त्यांना प्रत्येकी २० लाख रुपये द्यावेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.