Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- जैन संस्कृतीला समर्पित असलेल्या 'अभय प्रभावन' संग्रहालयाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न

पुणे :- जैन संस्कृतीला समर्पित असलेल्या 'अभय प्रभावन' संग्रहालयाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न 


पुणे - जैन तत्त्वज्ञान आणि भारतीय वारसा यांना समर्पित असलेल्या 'अभय प्रभावन' या संग्रहालयाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ५) उद्घाटन करण्यात आले. ५० एकर जागेत ३.५ लाख चौरस फूट बांधकाम असलेले हे संग्रहालय मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर पारवडी येथे उभारण्यात आले आहे.

जैन मूल्यांची सखोल समज निर्माण करणे, भारतीय मूल्य प्रणालीवर आणि समकालीन समाजात जैन मूल्यांची प्रासंगिकता यावर आधारित असणाऱ्या या संग्रहालयाची स्थापना 'अमर प्रेरणा ट्रस्ट'चे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी केली आहे. उद्घाटन समारंभास पद्मश्री गुरुदेवश्री राकेशजी (धरमपूर), पद्मश्री आचार्य चंदना जी महाराज (वीरायतन), दलाई लामा यांचे प्रतिनिधित्व करणारे परमपूज्य सीलिंग टोंगखोर रिनपोचे, केंद्रीय दळणवळण आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी, मेवाडचे महाराज कुमार लक्ष्यराज सिंह, केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनेका गांधी आणि पद्मभूषण डी. आर. मेहता उपस्थित होते.

अन्न, वस्त्र आणि निवारा आहे म्हणून सर्व छान होत नाही. आदर्श समाजासाठी संस्कार देखील आवश्यक आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये जीवन मूल्ये आहेत. जगात ज्या समस्या आहेत त्या आपण पाहतो. प्रगती, संपन्नता आणि विकास देखील समस्या घेऊन येतात‌. त्यामुळे या सर्वांसोबत मूल्याधिष्ठित जीवनपद्धती हवी, तरच जीवन सुखी होईल. भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी 'अभय प्रभावन'च्या माध्यमातून चांगल्या उपक्रमाची उभारणी करण्यात आला. हे केवळ संग्रहालय नाही तर प्रेरणादायी स्थान असून ते ज्ञान केंद्र ठरेल. फिरोदिया यांनी केलेले काम पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी राहील.

 नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

'अभय प्रभावन' हे श्रमण आणि जैन परंपरेच्या सखोल मूल्यांचे सन्मान करणारे संग्रहालय आहे. या मूल्यांचा प्रभाव हा हजारो वर्षांपासून देशाच्या नैतिक आणि सांस्कृतिक गाभ्यात आहे. हे संग्रहालय शिक्षण, व्यावसायिकता आणि नीतिमत्तेच्या तत्त्वांचा प्रचार करत केवळ संकल्पना म्हणून नव्हे तर सामाजिक मूल्य म्हणून प्रतिबिंबित करते. हे व्यक्तींना संतुलित आणि उद्देशपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन करेल. आम्हाला आशा आहे की, संग्रहालय लोकांना जैन धर्माद्वारे व्यक्त केलेल्या भारतीय सभ्यतेच्या आदर्श दहा मूल्यांचा शोध घेण्यास आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी प्रेरणा देईल.

- अभय फिरोदिया, अध्यक्ष, अमर प्रेरणा ट्रस्ट

असे आहे संग्रहालय -

अभय प्रभावन संग्रहालय हे अभ्यागतांना जैन धर्माच्या शिकवणींद्वारे भारतीय मूल्यांबद्दल माहिती देण्यासाठी उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात ३५० पेक्षा अधिक अद्वितीय कलाकृतींसह ३० विशेषतः डिझाइन केलेल्या गॅलरी आहेत. ज्यातून सामाजिक स्तरावर सुरक्षा, उत्पादकता, समृद्धी आणि वैयक्तिक स्तरावर करुणा, मुक्त विचारसरणी आणि नैतिक जीवन या जैन मूल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ५० एकर जागेवर पसरलेले हे संग्रहालय अद्ययावत ऑडिओ-व्हिज्युअल्स, ॲनिमेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि परस्परसंवाद प्रणालीने समृद्ध आहे. जैन तत्त्वज्ञानातील आध्यात्मिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ३५० हून अधिक कलाकृती, शिल्पे आणि भव्य प्रतिकृती येथे तयार केल्या आहेत. या संग्रहालयात ३५ प्रोजेक्टर, ६७५ ऑडिओ स्पीकर्स आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.