Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाचलुपतची कारवाई होऊन देखील पैसे कमवण्याची 'त्या' तलाठ्याची हौस नाही फिटली.

लाचलुपतची कारवाई होऊन देखील पैसे कमवण्याची 'त्या' तलाठ्याची हौस नाही फिटली.
 

शिरूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे कार्यरत असताना काळे तलाठी याला आठ वर्षापुर्वी एका शेतकऱ्याकडून नोंदीचे पैसे घेताना लाललुचपत विभागाने पाठलाग करून रंगेहात पकडले होते. सस्पेन्ड झाल्यानंतर पुणे येथे नोकरी करुन पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी शिरूर तालुक्यात प्रवेश करून नोंदीसाठी नावाप्रमाणेच 'विशाल' पैसे कमवण्यास सुरुवात केली आहे.

मध्यंतरी ज्या तालुक्यात नोकरी करत असताना लाललुचपत विभागाची कारवाई झाली आहे तेथे नियुक्ती देण्यात येत नाही असे परिपत्रक होते. याचा आधार घेत एका सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत आंदोलन करून त्याच्यासहीत अनेक जणांची बदली पुणे येथील प्रांत कार्यालयात केली होती.

परंतु वरीष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून मॅट मध्ये जात पुन्हा शिरूर येथे जैसे थे नियुक्ती मिळवली. निर्ढावलेल्या या तलाठयाने आता हायवेच्या कडेला गुंठामंत्री असणाऱ्या कोरेगाव भिमा सजातील नागरिकांकडून नोंदीसाठी तो मोठी आर्थिक लुट करत आहे. काळेंनी गुंठ्यांच्या अनेक बेकायदेशीर नोंदी केल्याचे काळे कारनामे समोर येत असून त्याने अनेक नोंदी प्रलंबित ठेवल्या आहे.

तसेच सणसवाडी येथील गोविंद घोडके हा तलाठी त्याच पद्धतीने कामकाज करत असून नोंदीसाठी येणाऱ्या नागरीकांची मोठी लुट करत असल्याचे समोर येत आहे. त्यानेही अनेक गुंठेवारीच्या नोंदी केल्या असून असून जांबुत येथून उड्डाण करून थेट सणसवाडी गाठले.

पैश्याच्या हव्यासापोटी या दोघांनी कहर माजवला असून या दोंघाची वरीष्ठ आधिकाऱ्यांनी तातडीने दप्तर तपासणी करुन दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तातडीने कारवाई न झाल्यास अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.