सांगली, दि.५ : इनामधामणी येथील पंढरपूरच्या पायी दिंडीचे प्रस्थान आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाले. जय जय राम कृष्ण हरी अशा गजरात अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम झाला. सांगली विधानसभा मतदारसंघातून पाच ते सात ठिकाणहून कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला पायी दिंड्या जातात. इनामधामणी येथे आज पायी दिंडीचे प्रस्थान होते. त्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना खास निमंत्रण देण्यात आले होते.
टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि हरिनामाचा गजर करीत सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते विणापूजन झाले. त्यानंतर श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचेही पूजन झाले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी सुधीरदादा गाडगीळ यांना अबीर बुक्का लावून शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिंडीप्रमुख भारत जाधव, अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नवलाई, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील, सचिन वडेर, बबन कोळी, प्रभाकर वडेर, प्रकाश कोळी, सुधीर पाटील, तन्मय पाटील, योगेश कदम, भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
सांगली: कार्तिकी वारीसाठी इनामधामणी -पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. त्यावेळी सुधीरदादांच्या हस्ते विणापूजन आणि श्री पांडुरंगाचे प्रतिमा पूजन झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.