महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना
कालपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी झगडणार्या मविआ नेत्यांवर सत्ता आणि मुख्यमंत्रीपद तर सोडाच, विरोधी पक्षनेतेपददेखील न मिळण्याची नामुष्की ओढवली आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारे संख्याबळ मविआतील कोणत्याही पक्षाला गाठता आले नाही, इतका लाजिरवाणा मविआचा यावेळी झाला.
लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर, अतिआत्मविश्वासात गेलेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. विरोधी पक्षनेतेपद मिळावे एवढ्या जागा देखील या आघाडीला मिळविता आल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीवर विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली आहे. महाविकास आघाडीचा प्रचंड लाजिरवाणा पराभव झाला. आघाडीतील ठाकरे गटाला २० जागा, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गट १० जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारे सं'याबळ मविआतील तीन प्रमुख पक्षांपैकी एकालाही गाठता आले नाही.
विरोधी पक्षनेते पदासाठी लागतात २९ जागा
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांपैकी १० जागा मिळवणे आवश्यक असते. म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी किमान २९ जागा मिळवणे गरजेचे आहे. मात्र, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाला २९ जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे कुणालाही विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही, अशी स्थिती मविआची झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.