दि माधवनगर कॉटन मिल्स कामगार संघर्ष समितीने अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. माधवनगर सुतगिरणी आपल्या परिसराचे वैभव होते. जवळपास १६०० ते १७०० कामगार काम करत होते. त्या काळात सूतगिरणी मुळे अनेक लोकांचे संसार, त्याचबरोबर त्यावर असणारे पूरक व्यवसाय खूप प्रमाणात चालत होते. आर्थिक सुबत्ता होती. परंतु अचानक काही कारणामुळे दि.२७ सप्टेबर १९९४ रोजी गिरणी बंद पडली आणि सोळाशे सतराशे कामगारांच्या वर उपासमारीची वेळ आली.
त्याच्यावर असणाऱ्या पूरक व्यवसाय व उद्योगधंदे सर्व बंद पडले. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यानंतर हे प्रकरण हाय कोर्टात गेले आहे. गेली 29 वर्ष माधवनगर कॉटन मिल्स संघर्ष समिती यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे जयश्री पाटील यानी हायकोर्टाच्या कामामध्ये पूर्णता मदत करणार असल्याचे सांगितले.
कॉटन मिलच्या कामगारांना अजून पर्यंत पगार, बोनस, ग्रॅज्युएटी मिळालेली नाही. यावर हाय कोर्टाने तातडीने काही तरी तोडगा काढावा असे जयश्री पाटील यांना सांगितले. जयश्री मदन पाटील यांनी सुद्धा या कामगारांना तुमच्या हायकोर्टाच्या कामांमध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यामुळे माधवनगर कॉटन मिल संघर्ष समितीच्या वतीने जाहीर केले की 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सहाय्य करू आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणाले की तुमच्या या विधानसभा निवडणुकीतील दैदीप्यमान विजयामध्ये आम्हा कामगारांचाही छोटासा खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही माधवनगर कॉटन मिल्स संघर्ष समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. यावेळी दि माधवनगर कॉटन संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीपती पाटील तात्या, जयवंत पाटील, एम एम खेतमर, लक्ष्मण तोडकर, सतीश वनारसे यांच्यासह अनेक माधवनगर कॉटन मिल्सचे कामगार उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.