Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसच्या पंजामुळे तुतारीची डोकेदुखी वाढली, मतदान न करताच मतदार माघारी फिरले

काँग्रेसच्या पंजामुळे तुतारीची डोकेदुखी वाढली, मतदान न करताच मतदार माघारी फिरले
 


कोणत्याही निवडणुकीत पक्षांच्या चिन्हाला मोठे महत्त्व असते. हे चिन्ह निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिन्हासाठी मोठा लढा दिला आणि न्यायालयाकडून चिन्ह मिळवून घेतले. कारण निवडणुकीत या चिन्हाचा मोठ प्रभाव मतदारांवर पडतो.

अशातच आता पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत पंजा चिन्हा नसल्याने अनेक मतदारांनी मतदानच केलं नसल्याची बाब समोर आली आहे. याचा थेट फटका महाविकास आघाडीकडून तुतारीवर उभे असलेले उमेदवार दुनेश्वर पेठे यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून  कृष्णा खोपडे तर महाविकास आघाडीचे दुनेश्वर पेठे हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी बंड केले आहे. त्यामुळे खोपडे आणि पेठे यांना मत विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशातच आता काँग्रेसचे पंजा चिन्हा नसल्याने पेठे यांचे जास्त नुकसान होताना दिसत आहे. कारण पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी येथून चार वेळा निवडून आले होते. त्यांचा बालेकिल्ला भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उध्वस्त ककर विजयाची हॅटट्रीक साधली आहे. आता ते विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत याच मतदारसंघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्य दिले आहे. या मतदारसंघावर काँग्रेसचाच दावा होता. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या हजारे यांनी तब्बल 80 हजार मते घेतली होती. असे असतानाही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. शरद पवार यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला.

यामुळे मोठी नाराजी आधीपासूनच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये दिसून येत आहे. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पंजा चिन्ह घरोघरी पोहचले आहे. मात्र, यावेळी ते ईव्हीएममध्ये दिसत नसल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे. यावेळी आघाडीचे उमेदवार तुतारीवर लढत आहेत हेच अनेकांना माहिती नाही. त्यामुळे मतदारसंघातील हे आघाडीचे मोठे अपयश असल्याचं बोललं जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.