Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतदानाच्या दिवशी भररस्त्यात रचला भानामतीचा घाट..; करणीमुळे उमेदवार भयभीत..; नेमका प्रकार काय?

मतदानाच्या दिवशी भररस्त्यात रचला भानामतीचा घाट..; करणीमुळे उमेदवार भयभीत..; नेमका प्रकार काय?
 

रायगड : राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरु आहे. जनता मोठ्या उत्साहाने मतदान करत आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील बिरवाडीमध्ये भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आला आहे. महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावर एका रस्त्यावर मधोमध तीन मडकी आणि नारळ रचून ठेवण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

लाल आणि काळ्या फडक्याने मडक्याचं तोंड बंद करून खाली नारळ अशा स्वरूपाचा भानामतीचा हा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिरवाडी आसनपोई रस्त्यावरील नाक्यावर रस्त्याच्या मधोमध हा उतारा ठेवण्यात आला होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणी देवदेवस्की केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी हा सगळा प्रकार उधळून लावला असून ही मडकी फेकून देण्यात आली आहे.

महाडमध्ये अशी आहे लढत..
यंदा महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष असलेले भरत गोगावले आणि ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यामध्ये लढत रंगत आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा गोगावले विजयी झालेले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.