Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्तेचा सगळा गेम 'इथे' होणार चेंज.. कोण कुठे जिंकणार? संपूर्ण यादीच..

सत्तेचा सगळा गेम 'इथे' होणार चेंज.. कोण कुठे जिंकणार? संपूर्ण यादीच..

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वांचीच उत्सुकता ताणली जात आहेत. कारण या निवडणुकीत नेमकं काय होणार याचा कोणालाही अंदाज लावता येत नाहीए.


मात्र, असं असलं तरीही काही सर्व्हे आता समोर येत आहे. त्यापैकीच एका सर्व्हेची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. द महाराष्ट्र अॅनालिटीका या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून महाराष्ट्रातील 10 महत्त्वाच्या जिल्ह्यातील सर्व्हे समोर आले आहेत. ज्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील याचा थेट अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे हे यंदा निवडणुकीचा संपूर्ण निकाल पालटू शकतात. त्यामुळे या विभागांमधील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जो सर्व्हे करण्यात आला त्याबाबत आम्ही आता आपल्याला नेमकी माहिती देणार आहोत.

हे 10 जिल्हे बदलणार सत्तेची समीकरणं?

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 जागा असून त्यापैकी केवळ 2 जागा या महायुतीला तर महाविकास आघाडीला 7 आणि इतरांना 1 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 जागा असून त्यापैकी महायुतीला 2 जागा आणि महाविकास आघाडीला 8 तर इतरांना 1 जागा मिळेल असं सर्व्हेत म्हटलंय.
 
सांगली: सांगली जिल्ह्यात एकूण 8 जागा असून त्यापैकी 2 जागा या महायुतीला तर महाविकास आघाडीला 6 जागा जिंकण्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
 
पुणे: पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा या पुणे जिल्ह्यात आहेत. तब्बल 21 जागा जिल्ह्यात असून त्यापैकी महायुतीला 7 आणि महाविकास आघाडीला 14 जागा मिळतील असं म्हटलं आहे.

धाराशिव: धाराशिव (उस्मानाबाद) मधील एकूण 4 जागांपैकी चारही जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येथे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
 
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 जागा असून त्यापैकी केवळ 3 जागा या महायुतीला तर महाविकास आघाडीला 9 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे..
 
सातारा: सातारा जिल्ह्यातील एकूण 8 जागांपैकी महायुतीला 5 तर महाविकास आघाडीला 3 जागा जिंकेल असं सर्व्हेत म्हटलं आहे.
 
बीड: मराठा आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण हे सध्या घुसळून निघतंय. अशावेळी येथील 6 जागा केवळ 2 जागा या महायुतीला तर महाविकास आघाडीला 4 जिंकण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
 
जालना: बीडप्रमाणे जालना जिल्हा देखील मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. ज्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा या जिल्ह्यात महायुतीला बसू शकतो. कारण येथे एकही जागा महायुतीला जिंकता येणार नाही असं द महाराष्ट्र अॅनालिटीकाच्या सर्व्हेत म्हटलं आहे. येथील सगळ्या म्हणजे 5 जागा या मविआला मिळण्याची शक्यता आहे.
 
लातूर: लातूर जिल्ह्यात दोन्ही आघाड्यांना समसमान जागा मिळतील असा अंदाज आहे. इथे एकूण 6 जागा आहेत ज्यापैकी प्रत्येकी 3-3 जागा या महायुती आणि महाविकास आघाडीला मिळू शकतात.
 
पश्चिम महाराष्ट्रात 70 पैकी तब्बल 48 जागा या महाविकास आघाडी आणि केवळ 20 जागा या महायुती जिंकतील असाही अंदाज यावेळी वर्तविण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.