कोल्हापूर : दिवाळीनिमित्त पतीसोबत देवदर्शनाला निघालेल्या मोनाली योगेंद्र पाटील (वय ३०, रा.इंदिरानगर, वडणगे) यांचा अपघाती मृत्यू झाला. वडणगे गावातील अस्वले मळ्याजवळ शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी घसरून हा अपघात घडला.
ऐन दिवाळीदिवशी घडलेल्या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाटील कुटुंबीय शनिवार पेठेत राहण्यास होते. त्यांनी अडीच वर्षांपूर्वी वडणगेत स्वतःचे घर घेतले होते. शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस असल्याने पाटील दाम्पत्य देवदर्शनासाठी बाहेर पडले होते.
शहराकडे येत असताना अस्वले मळ्याजवळ त्यांची दुचाकी घसरली. दोघेही रस्त्यावर कोसळले. यामध्ये मोनाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.