बलात्काराबद्दल एकास दहा वर्षांची शिक्षा
तासगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पांडुरंग श्रीरंग केंगार असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी केंगार याने एका अल्पवयीन मुलीस मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून एका गावात नेले. जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. पीडित मुलीने याप्रकरणी २०२० मध्ये तासगाव पोलिसांत आरोपी केंगार याच्या विरोधात पांडुरंग केंगार फिर्याद दाखल केली होती. सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनेचा तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश काकडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. गुन्हा सिद्ध झाल्याने केंगार यास १० वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.