सांगली, दि.८ : येथील कृष्णा नदी तीरावर आज छटपूजेचा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होते. कृष्णामाई आणि उगवता सूर्य यांचे पूजन झाल्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले.
दिवाळीनंतर सहाव्या दिवशी (षष्ठी) छटपूजेचा धार्मिक सोहळा साजरा केला जातो. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यात प्रामुख्याने छटपूजेचे महत्त्व फार मोठे आहे. सांगलीतही उत्तर भारती मोर्चातर्फे दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो. दिवाळीनंतरच्या सहाव्या दिवशी उगवत्या सूर्याला आणि मावळत्या सूर्याला नमन करून पूजन केले जाते. तसेच श्री गंगा नदीचेही पूजन केले जाते. देशात उत्तर भारतीय समाजातर्फे त्या त्या ठिकाणी गंगेच्या रूपात तेथील स्थानिक नदीचेही पूजन केले जाते.छटपूजेच्या या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजक उत्तर भारती मोर्चाचे अध्यक्ष मनीषसिंग, प्रदेश सचिव सुभाष मिश्रा आणि प्रदेश संघटन मंत्री धनेश्वर सक्सेना यांनी सुधीरदादा गाडगीळ यांना या धार्मिक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. उगवत्या सूर्याला नमन केल्यानंतर कृष्णामाईचेही पूजन करण्यात आले. त्यावेळी सुधीरदादांनी छटपूजे निमित्त उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
फोटो
सांगली : येथील कृष्णा नदी तीरावर छटपूजेचा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.