महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला.
मविआला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान स्पष्ट बहुमत
मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु झाली
आहे. तसेच कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याचीही राज्यात चर्चा
सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा उद्या सोमवारी 25
नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे.
हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहे. यावेळी कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे लक्ष लागले आहे. ज्याचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रिपदे मिळतील, अशी शक्यता आहे. पाहूयात संभाव्य मंत्र्यांची नावे…
भाजप –देवेंद्र फडणवीसचंद्रशेखर बावनकुळेचंद्रकांत पाटीलमंगलप्रभात लोढारविंद्र चव्हाणसुधीर मुनगंटीवारराधाकृष्ण विखे पाटीलआशिष शेलारगणेश नाईकप्रवीण दरेकरराहुल नार्वेकरगिरीष महाजनअतुल भातखळकरनितेश राणेराहूल कूलसंजय कुटेमाधुरी मिसाळपंकजा मुंडेमंदा म्हात्रेदेवयानी फरांदेएकनाथ शिंदे शिवसेना –एकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलदादा भुसेभरत गोगावलेसंजय शिरसाटउदय सामंतदीपक केसकरसंजय राठोडशंभूराज देसाईअब्दुल सत्तारअजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस –अजित पवारदिलीप वळसे पाटीलधनंजय मुंडेछगन भुजबळहसन मुश्रीफआदिती तटकरेधर्मरावबाबा आत्रमअनिल पाटीलनरहरी झिरवाळआण्णा बनसोडे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.