सांगली दि.७: संजयनगर ही घाम गाळून पोट भरणाऱ्या वंचितांची लोकवस्ती असलेला सांगलीचा महत्वाचा भाग.या भागातील नागरिक समस्यांनी हैराण झाले आहेत. या भागात आमदार गाडगीळ दहा वर्षांत कधी फिरकलेच नाहीत.इथे धड रस्ते नाहीत, गटारींचा पत्ताच नाही, जे आहेत ते तुंबलेले, घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव,दलदलीचा भाग, वाढते आजारपण, प्यायला शुध्द व मुबलक पाणी पुरवठा नाही, त्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे. आपण आमदार झाल्याशिवाय आमच्या समस्या सुटणार नाहीत. आम्ही तुम्हाला भरघोस मतांनी निवडून देणार अशा भावना आज गृहभेटीवेळी संजयनगरात नागरिकांनी पृथ्वीराज पाटील यांच्या समोर व्यक्त केल्या.
निवडणूक प्रचारासाठी आज पृथ्वीराजबाबा पाटील यांनी संजयनगर भागात नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या गार्हाणी ऐकली तसेच शिंदे मळ्यातील प्रा. धनंजय पाटील यांच्या जिमला भेट देऊन व्यायामपटूंशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व दि. २० नोव्हेंबर रोजी माझ्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. या भागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
यावेळी म्हादबा मुकादम, बाजीराव शेजुळ, शंकर यमगर, ए. डी. पाटील, प्रशांत देशमुख, विजय चव्हाण वकील, नितीन तावदारे , प्रा. एन.डी.बिरनाळे, रघुनाथ नार्वेकर, गौस नदाफ, अभिजित सुर्यवंशी, विकास पाटील, श्रीकांत साठे, साजिद शेख, सौरभ रोकडे, आशिष चौधरी व संजयनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.