Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

HIV पॉझिटिव्ह मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात चक्क 20 जण अडकले? मुलीचा कारनामा वाचून बसेल धक्का, तरुणांनाही झाला संसर्ग

HIV पॉझिटिव्ह मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात चक्क 20 जण अडकले? मुलीचा कारनामा वाचून बसेल धक्का, तरुणांनाही झाला संसर्ग
 

आजकाल हनी ट्रॅपच्या  घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी याच्या जाळ्यात अडकत आहेत. अशीच एक धक्कादायक बातमी उत्तराखंडमधून समोर आली आहे, नशेच्या आहारी गेलेल्या मुलीच्या प्रेमात पडून तब्बल 20 जण एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले आहेत. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अखेर मुलीने मुलांना आपल्या जाळ्यात कसे अडकवले? जाणून घ्या..


अवघ्या 5 महिन्यांत 19 जणांना एचआयव्हीची लागण?

नैनिताल जिल्ह्यातील रामनगर परिसरातून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. " उत्तराखंड येथील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर परिसरातून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.अवघ्या पाच महिन्यांत 19 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामागे एका मुलीचा हात असल्याचे सांगितले जाते, जिच्या संपर्कात आल्यानंतर सर्वांना संसर्ग झाला आहे. या मुलीच्या संपर्कात लोक कसे आले? 19 जणांना हे सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याचे कसे कळले? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ही मुलगी लोकांना आपल्या जाळ्यात 'अशी' अडकवायची

मिळालेल्या माहितीनुसार, गुलरघाटी परिसरात 17 वर्षीय तरुणीला नशा करण्याचे व्यसन लागले होते. जेव्हा जेव्हा तिला ड्रग्जसाठी पैशांची गरज भासायची तेव्हा ती मुलांना फूस लावून फोन करायची. तिच्या संपर्कामुळे मुलांना एचआयव्हीची लागण झाली, अनेक मुलांची लग्ने झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीही एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यामुळे एकूण 19 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यामध्ये 15 महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

नैनितालमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरणात वाढ

रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, नैनिताल जिल्ह्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरणे वाढत आहेत आणि रामनगर सर्वात वर आहे. रामनगरमध्ये 17 महिन्यांत 45 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतच 19 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यामध्ये 30 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. 30 पुरुषांपैकी 20 तरूणांना अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलीच्या संपर्कात आल्याने ही लागण झाली आहे.

सावधान! ती आधी लोकांना आमिष दाखवते...मग..

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी अंमली पदार्थांचे सेवन करते आणि शहरातील कोणत्याही गल्लीबोळात खुलेआम फिरताना दिसते. ड्रग्जसाठी पैसे गोळा करण्यासाठी ती लोकांना आमिष दाखवून तिच्याकडे बोलावत असे. आता या मुलीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. सांगली दर्पण यातून कोणताही दावा करत नाही. )

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.