आजकाल लोक कमाईचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. पण एक बिजनेसमॅन अनोख्या व्यवसायातून कोट्यावधी रुपये कमवत आहे, त्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. या व्यक्तीला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.
ही कहाणी आहे उत्तरप्रदेशातील राधेश अग्रहरी यांची, ज्यांनी टाकाऊ वस्तूव उपयोगात आणून उत्तम प्रोडक्ट्स बनवले आहेत. राधेश हे मेलेल्या कोंबड्यांच्या पिसांपासून प्रोडक्ट्स बनवून विकत आहेत. सोबतच त्यांनी गावातील बेरोजगार महिलांना रोजगार देखील दिला आहे. अवघ्या 16000 रुपयांत सुरु केलेला हा व्यवसाय आता करोडोंच्या घरात पोहचला आहे.
मूळचे उत्तरप्रदेशातील फतेहपूरमधील राधेश अग्रहरी हे जयपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट्स अँड डिझाईनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते, तेव्हा त्यांना सध्याची समस्या कमी करण्यासाठी कॉलेजने एक प्रोजेक्ट दिला होता. प्लॅस्टिक, सॅनिटरी नॅपकिन्स, पेपर अशा समस्यांवर अनेक मुले काम करत होती, पण त्यांनी अन्नाच्या टाकाऊ वस्तूंवर काम करण्याचा विचार केला. जेव्हा त्यांनी यावर काम केले तेव्हा त्यांनी सांगितले की भारतात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारच्या अन्नापासून टाकाऊ पदार्थ तयार होतात. मग त्यांनी मांसाहारावर संशोधन करून त्यावर काम सुरू केले.
अशी सुचली कल्पना
राधेश यांच्या निरिक्षणात आले की एकट्या दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये 2013 मध्ये 30 लाख मेट्रिक टन कचरा चिकन वेस्ट मटेरियलपासून तयार झाला होता, जो नंतर जाळला गेला किंवा फेकून दिला गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. मग हे सर्व पाहून त्यांनी चिकन वेस्टवर काम सुरू केले आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी चिकन फायबर साफ करून त्यापासून कापड आणि कागद बनवण्यास सुरुवात केली. आज त्यांनी 386 हून अधिक उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यांची शार्क टँकमध्येही दखल घेतली गेली आहे.
पंधराशे महिलांना रोजगार
राधेश यांनी राजस्थानमध्येच कारखाना सुरू केला पण मृत कोंबड्यांची पिसे स्वच्छ करण्यासाठी खूप लोकांची आवश्यकता होती, म्हणूनच 1400 हून जास्तआदिवासी महिलांना रोजगार देऊन त्यांनी त्यांना स्वावलंबी बनवले आहे. हजारो झाडे तोडण्यापासून वाचवली असून पर्यावरण वाचवण्याचा मोठा उपक्रमही सुरू केला आहे.
दहा कोटींची उलाढाल
राधेश सांगतात की, उबदार कपड्यांमध्ये पश्मीना सर्वोत्तम मानली जाते. पण कोंबडीच्या पिसापासून बनवलेले हे कापड जगातील सहावे नैसर्गिक फायबर आहे. कापूस किंवा लोकरीप्रमाणे ते तयार होण्यास त्याला एक वर्षांचा कालावधी लागत नाही उलट ते 7 दिवसांत तयार होते. जे पश्मीनापेक्षा मऊ आहे. याशिवाय, ते पश्मीनापेक्षा स्वस्त कास्टिंगमध्ये उबदार कपडे तयार होतात आणि ते वर्षानुवर्षे वापरता येतात. राधेश यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी आपले काम फक्त 16,000 रुपयांपासून सुरू केले होते, पण आज ते 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल करतात. या कार्यामुळे त्यांना गोल्डन फेदर म्हणून ओळखले जाते, त्यांना अनेक मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अशी होते प्रक्रिया
प्रथम कोंबडीची पिसे निर्जंतुक केली जातात. यानंतर ती वेगळी करून त्यापासून धागा बनवला जातो. मग धाग्यापासून कापड आणि कागद तयार केला जातो. एका कोंबडीपासून 70 ग्रॅम पिसे मिळतात. तर 1 किलो पिसापासून 12 टक्के कापड आणि 88 टक्के कागदी साहित्य मिळते. मोठी गोष्ट म्हणजे एक किलो पांढरा कागद तयार करण्यासाठी 200 लिटर स्वच्छ पाणी वापरले जाते. पण कोंबडीच्या पिसापासून कागद बनवण्यासाठी फक्त 10 लिटर पाणी लागते. तसेच, वापरलेल्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी पुन्हा वापरता येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.