गर्लफ्रेंड हिना आणि बॉयफ्रेंड एहतशाम उर्फ बबलू हॉटेलच्या रूममध्ये होते. खोलीच्या आत प्रेयसीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि असं काही केलं की पोलिसांना तात्काळ हजर व्हावे लागले.
या घटनेबाबत संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे. मुलगा आणि मुलगी प्रौढ होते आणि त्यांच्यात गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या जबाबात काही गोष्टींची पडताळणी व्हायची आहे, त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हॉटेलच्या रुममध्ये आरडाओरडा ऐकून पोलीस तेथे पोहोचल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. येथे खोलीच्या आत प्रेयसीने प्रियकर एहतशाम उर्फ बबलूचा प्रायव्हेट पार्ट कटरने कापला होता. दोघांमध्ये हाणामारी होऊन दोघेही जखमी झाले आहेत. तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला मेरठच्या हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
प्रेयसीने प्रियकराला हॉटेलमध्ये बोलावलं
आरोपी प्रेयसीने फसवणूक करून प्रियकराला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले असता तिने ही घटना घडवली. त्यादरम्यान प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे प्रियकरासह आरोपी प्रेयसीही या घटनेत जखमी झाली.
8 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण
घटनेत जखमी झालेल्या प्रेयसी आणि प्रेयसीचे गेल्या 8 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, मात्र नंतर प्रियकराचं लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीने ही भीषण घटना घडवली. दोघेही चारथावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हेडी गावचे रहिवासी आहेत. मेरठ जिल्ह्यातील सिवाल खास गावात प्रियकर एहतशामचे लग्न एका मुलीसोबत निश्चित झाले होते. 15 दिवसांपूर्वी प्रियकराच्या एंगेजमेंटचा राग आल्याने प्रेयसी हिनाने रविवारी प्रियकर एहतशामला भेटण्याच्या बहाण्याने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. यादरम्यान दोघांमध्ये यावरून वाद झाला.
पोलिसांनी दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सीओ सिटी व्योम बिंदल यांनी सांगितले की, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये एक मुलगा आणि मुलीमध्ये भांडण झाले होते ज्यामध्ये मुलीने मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला होता आणि मुलीच्या हाताला दुखापत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.मुलीचे म्हणणे आहे की, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये मुलाने हस्तक्षेप केला, ज्यामुळे मुलीच्या हातावरही कट पडला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी हॉटेलच्या खोलीबद्दल बोलत होती आणि मुलगा गाडीच्या आत घडलेल्या घटनेबद्दल सांगत होता, अद्याप तपास सुरू आहे. दोन्ही बाजू आपापली मते मांडत आहेत. त्यांचे सीडीआर आणि इतर रेकॉर्ड पाहिल्यानंतरच हे कळेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.