साऊथ चित्रपटसृष्टीतीलप्रसिद्ध अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिने काल (शुक्रवारी) रात्री आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. 30 नोव्हेंबरच्या रात्री 30 वर्षीय शोबिता हैदराबाद येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, शोभिताने वयाच्या 30 व्या वर्षी आत्महत्या केली. 30 नोव्हेंबरच्या रात्री तिने हैदराबादच्या कोंडापूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शोभिता ही कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथे राहत होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी शोभिताचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शोभिताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
वृत्तानुसार, बेंगळुरूमध्ये शोभिताचे अंतिम संस्कार केले जाऊ शकतात. शोभिताने बेंगळुरूमध्ये राहून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. तिने अल्पावधीच छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख तयार केली होती. 12 हून अधिक लोकप्रिय मालिकांमध्ये शोभिताने काम केलं. त्यात गालीपाता, मंगला गौरी, कोगिले या लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, शोभिताने एराडोंडाला मूरू, एटीएम, ओंडू काथे हेलवा आणि जॅकपॉट सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.
लग्नानंतर तेलुगु सिनेमाकडे कल…
शोभिताचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर शोभिता हैदराबादमध्ये राहू लागली आणि याच कारणामुळे तिने तेलुगू सिनेमात काम शोधायला सुरुवात केली. तिने अनेक तेलगू सिनेमात काम केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.