विश्वरत्न,भारतरत्न,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यातून प्रत्येक समाजाला समोर धरून दोन वर्ष 11 महिने 18 दिवस दिवस रात्र मेहनत करून देशाची राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेवरती पूर्ण देश चालतो हे भारतीय जनता पार्टीच्या खेडेगावातील शाखेपासून ते दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत मान्यच नाही. म्हणून विश्वरत्न, भारतरत्न,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम जिथे संधी मिळेल तिथे अपमान करण्याचा,तिरस्कार करण्याच, व केलेल्या उल्लेखनीय कार्याची कायम खिल्ली उडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून विशेष करून जे देशाच्या महत्त्वाच्या पदावरती बसलेले आहेत अशा व्यक्तीकडून होत आहे.
ती व्यक्ती म्हणजे तडीपार गुंड,अनेक मर्डर केस मधला गुंड, गोधरा हत्याकांडाचा मास्टरमाइंड,न्यायाधीशाला मारण्याचा गट रचला ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या ठिकाणी देशाचे पवित्र मंदिर आहे अशा संसद मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केले म्हणून आम्ही सांगलीच्या उपजिल्हाधिकारी आरडीसी ज्योती पाटील मॅडम यांच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी समस्त बहुजन आंबेडकर समाजाच्या काय भावना आहेत ते निवेदनाद्वारे कळवले आहेत व गृहमंत्री अमित शहा यांचा पंतप्रधानाने राजीनामा घ्यावा असेही निवेदनात म्हटले आहे. या वेळेला नंदकुमार सुर्वे, शरद सरगर, खोदबदिन मुजावर, एम के कोळेकर ,प्रताप पाटील, देवराज शिंदे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळेला सर्वांनी तडीपार गुंड गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.