मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात पेन ड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून मोठा दावा समोर आला आहे. महाविकास आघाडी काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांकडे करण्यात आला आहे.
पेनड्राईव्हमध्ये या संदर्भातील स्टिंग ऑपरेशन आहे. यूएलसी घोटाळ्याचा ठपका ठेवून एकनाथ शिंदे यांना अडकवण्याच्या सूचना संजय पांडे यांना देण्यात आल्या होत्या. फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याचे आदेश आले होते. एसीपी पटेलांचा स्टींग ऑपरेशनमध्ये दावा करण्यात आला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदे हे त्यावेळी मंत्री होते आणि मंत्री असताना सरकारमध्ये असताना त्यांना आरोपी करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. त्यावेळचे सहाय्याक पोलीस आयुक्त पटेल यांनी स्टिंग ऑपरेशन केले आहे. ऑगस्ट २०२४ ला संजय पुनमिया यांनी ही तक्रार दाखल केली होती. या दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पटेल, संजय पांडे, मनोहर पाटील अनेक पोलिस अधिकारी तसेच काही व्यापारी यांनी मिळून हे षडयंत्र रचले आहे. तसेच सरकारी वकील शेखर जगताप यांचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. ही एफआयआर क्वॅश करण्यासाठी संजय पांडे आणि शेखर जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने याची दखल घेतली आहे. विशेष म्हणजे तपासअधिकाऱ्यांकडे हा इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर केलाय. एकीकडे नागपूरला विशेष हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, तसेच चार-पाच दिवसांपूर्वी ठाण्याच्या क्राईम ब्रान्चने केलेली चौकशी या घटना तातडीने घडत आहे यातून वेगळे संदेश येत आहेत.एकनाथ शिंदे मंत्री असताना घोटाळ्यात अडकवण्याच्या सूचना देण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकरणाशी संबंध नसताना देखील त्यांना अडकवण्यासाठी मविआ सरकारच्या काळात षडयंत्र रचलं गेलं का असा सवाल उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.