Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हनीमूनसाठी गोव्याला गेलं कपल, रोमँटिक ट्रिपवरून परतल्यानंतर धाय मोकलून रडू लागली वधू; घडलं काय?

हनीमूनसाठी गोव्याला गेलं कपल, रोमँटिक ट्रिपवरून परतल्यानंतर धाय मोकलून रडू लागली वधू; घडलं काय?
 

नवी दिल्ली : लग्न म्हणजे क्षण प्रत्येक मुलामुलीसाठी खूप खास क्षण असतो. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात एक नवी सुरुवात होते. लग्नानंतर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी कपल जातात ते रोमँटिक ट्रिप हनीमूनला. उत्तर प्रदेशमधील असंच एक कपल जे हनीमूनसाठी गोव्याला गेलं. पण त्यानंतर असं काही घडलं की नवरी धाय मोकलून रडू लागली.

उत्तर प्रदेशच्या चाकेरी येथील अहिरवणमधील ही घटना. इथं राहणारा 32 वर्षांचा आकाश. एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याचा मोठा भाऊ, ज्याचं नाव अतुल आहे, तो ऑस्ट्रेलियात काम करतो. आई-वडिलांच्या निधनानंतर कुटुंबात दोनच भाऊ आहे. आकाशचं लग्न लखनऊमध्ये राहणाऱ्या सोनालीशी झालं. 9 डिसेंबर रोजी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघंही गोव्याला हनीमूनला गेले. शुक्रवारी रात्री उशिरा दोघंही गोव्याहून कानपूरला परतले.
गोव्याहून परत येताच आकाश त्याच्या पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडून स्वतःच्या घरी परत आला. तेव्हा तो घरी एकटाच होता. शनिवारी दुपारी त्याचा एक मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला. तेव्हा त्याला आकाश बेडवर पडलेला दिसला. हे पाहून त्याचा मित्र खूप घाबरला. आरडाओरड करत तो रूममधून बाहेर आला पळून गेला. यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचली. त्याने सर्वांना माहिती दिली आणि त्याला कांशीराम रुग्णालयात नेलं. पण आकाशचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आकाशच्या मृत्यूमुळे सासरच्या मंडळींसह कुटुंबात खळबळ उडाली होती. नवी नवरी धाय मोकलून रडू लागली. माझ्या मेहंदीचा रंग उडण्यापूर्वीच माझं लग्न उद्ध्वस्त झालं. असं ती म्हणाली. रडता रडता ती बेशुद्ध झालं. लग्नाच्या 12 दिवसांनंतरच कपलचा संसार उद्ध्वस्त झाला.

पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडल्यानंतर तो घरी एकटाच होता. त्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच चाकेरी पोलीस ठाण्याचे पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. चौकशीनंतरही मृत्यूचं कारण समजू शकलं नाही. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या प्रकरणी अधिक माहिती देताना डीसीपी पूर्व श्रवण कुमार सिंह म्हणाले - प्राथमिक तपासात मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने किंवा अन्य आजारामुळे झाल्याचे दिसते, परंतु घटनास्थळाच्या तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.