Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ईडी'ची ईडा पीडा टळणार? सुप्रीम कोर्टाने अधिकारांना लावली कात्री

'ईडी'ची ईडा पीडा टळणार? सुप्रीम कोर्टाने अधिकारांना लावली कात्री
 

सुप्रीम कोर्टाने ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे हात बांधले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते. आतापर्यंत वेगवगेळ्या नेत्यांना किंवा उद्योगपतींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडी अधिकारी मोबाईल आणि लॅपटॉप तपासू शकणार नाही. त्याचबरोबर संशयिताचा मोबाईल, लॅपटॉपचा अॅक्सेसही घेता येणार नाही शिवाय डेटा कॉपी करता येणार नाही.

छापा टाकल्यानंतर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये "लॉटरी किंग" सेंटियागो मार्टिन त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात कोर्टाने हा आदेश दिला आहे. या आदेशात विशेष करून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचं न्यायालयाने सांगितले आहे. झडतीदरम्यान जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सामग्रीची कॉपी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

छापेमारी दरम्यान ईडीने 12.41 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना 'ईडी'ने 6 राज्यांतील 22 ठिकाणी छापे टाकून 'लॉटरी किंग सँटियागो मार्टिन'चे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडून अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती.

न्यायमूर्ती अभय एस ओका आणि पंकज मित्तल यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 13 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात ईडीला सँटियागो मार्टिन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून डेटा काढण्यास आणि कॉपी करण्यास प्रतिबंध केला आहे. वैयक्तिक डेटासाठी समन्स जारी करण्यासही न्यायालयाने ईडीला बंदी घातली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.