Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

PAN 2.0: इन्कम टॅक्सच्य पोर्टलवरुन तयार करा पॅन कार्ड, फक्त ३० मिनिटांत येईल ई-मेल

PAN 2.0: इन्कम टॅक्सच्य पोर्टलवरुन तयार करा पॅन कार्ड, फक्त ३० मिनिटांत येईल ई-मेल
 

भारत सरकारने PAN 2.0 प्रोजेक्ट सुरु केला आहे. यामध्ये पॅन कार्डला नवे रुप दिले जाते. सरकारने PAN 2.0 प्रोजेक्टसाठी चांगला निधी जमा केला जातो. पॅन कार्ड २.० मध्ये क्यू आर कोड असणार आहे. तुमचे नवीन पॅन २.० ई-मेलवर येणार आहे.

 
PAN 2.0 काय आहे?
पॅन कार्ड २.० डिजिटल पॅन कार्ड आहे. ज्यात क्यूआर कोड असणार आहे. हे कार्ड ३० मिनिटांत तुमच्या ई-मेलवर येणार आहे. यामुळे ऑफलाइन पद्धतीने पॅन कार्ड बनवण्याची गरज नाही. पॅन कार्डच्या डिलिव्हरीसाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ३० मिनिटांत ई-मेलवर पॅन कार्ड मिळणार आहे.

पॅन कार्डसाठी अप्लाय कसं करावा?

तुम्ही इन्कम टॅक्स च्या पोर्टलवर जाऊन पॅन कार्डसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी ई-पॅन कार्ड पोर्टलवर जा. त्यानंतर होमपेजवर Apply For Instant PAN वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाका. यानंतर तुमच्या लिंक नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या ई-मेल आयडीची माहिती भरा. त्यानंतर ३० मिनिटांत e-PAN ई-मेलवर येईल. नवीन पॅन कार्डसाठी तुम्ही NDSL च्या साइटवरदेखील अर्ज करु शकतात. पॅन कार्ड २.० साठी तुम्हाला कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाही. फिजिकल पॅन कार्ड बनवण्यासाठी चार्ज द्यावे लागतात. 

लाभ पॅन २.० या प्रोजेक्ट

पॅन २.० या प्रोजेक्टसाठी सरकार १४३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे पॅन कार्डचे अपग्रेडेट व्हर्जन असणार आहे. हे नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्डसाठी अर्ज करु शकतात.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.