वॉशिग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक निर्णयांमध्ये बदल केला आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार
पुनरागमन करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या काही निर्णयांनी
जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अमेरिकेची भूमिका काय
असे याचा ट्रेलर ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सत्तेवर येताच
त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान शपथ घेतल्यानंतर ट्रम्प
यांनी काही देशांना उघडपणे धमकी दिली आहे. यामध्ये भारत आणि चीनचाही समावेश
आहे.
मेक्सिको आणि कॅनडावर 25 कर लागू
ट्रम्प यांनी सत्तेवर येताच कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिका 1 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांकडून 25 टक्के कर वसूल करेन. ट्रम्प यांच्या या आदेशानंतर त्यांनी असे काही म्हटले आहे की, संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्णाणा झाले आहे. ट्रम्प यांनी एकाच वेळी 11 देशात खळबळ माजवली आहे. या 11 देशांच्या यादीत भारत आणि चीनही सामील आहे.
ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना उघडपणे धमकी
सोमवारी शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी लगेचच, स्पेनसह ब्रिक्स देशांना उघडपणे धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनसह ब्रिक्स देशांवर 100% टक्के कर लादला जाऊ शकतो असे म्हटले आहे. तसे पाहायला गेले तर निवडणुकीच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डिसेंबर मध्ये ब्रिक्स देशांवर कर लागू करण्याचे संकेत दिले होते. यासाठी त्यांनी एक अट देखील ठेवली आहे. ब्रिक्स देशांमध्ये एकूण 10 देशांचा समावेश असून आता स्पेन देखील ट्रम्प यांच्या रडारवर आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.
जुन्या धमक्यांची पुनरावृत्ती
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेताच त्यांच्या निवडणुकी दरम्यानच्या धमक्यांची पुनरावृत्ती केली आहे. ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात देखील अनेक मोठे निर्णय घेतले होते आणि यावेळीही अनेकजण त्यांच्या रडावर आहेत. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना धमकी देत म्हटले आहे की, अमेरिका विरोधी धोरणांना ब्रिक्स देशांनी पाठिंबा दिला तर त्यांनी परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे.डिसेंबर 2024 दरम्यान त्यांनी अमेरिकन डॉलरला कमकुवत करण्यासाठी किंवा डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाला पाठिंबा देण्यासाठी नवीन चलन तयार केले तर त्या सर्व देशांवर 100 टक्के कर लादण्यात येईल आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल असे म्हटले होते. ट्रम्प यांची ही धमकी खरी ठरली तर ब्रिक्स देशांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. यामध्ये भारताचाही समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.