Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस दलाने कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला, API रावसाहेब शिंदेंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

पोलीस दलाने कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला, API रावसाहेब शिंदेंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
 

मालवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांचे २ डिसेंबरला त्यांच्या राहत्या घरात निधन झालंय. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. छातीत अचानक कळ आल्यानं कुटुंबाने त्यांना मीरा रोड येथील खासगी रूग्णालयात नेलं.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. मृत्यूचे कारण ह्रदयविकाराचा झटका असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. त्यांच्या मृत्यूनंतर पोलीस विभागाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलीस दलाने कर्तबगार अधिकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याआधी कांदिवली, समता नगरमध्ये रावसाहेब कार्यरत होते. रावसाहेब शिंदे कर्तव्यपथपर नेहमी लोकांसाठी खंबीरपणे उभे राहायचे. मात्र, त्यांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाल्यानं लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अहमदनगर संगमनेर येथे अंत्यसंस्कार होणार असून, याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र गिरनार यांचा अपघाती मृत्यू
नव वर्षाच्या सुरूवातीलाच पिंपरी चिंचवडमध्ये एका अपघातामुळे पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र गिरनार यांचा मृत्यू झालाय. भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. 

जितेंद्र गिरनार चारचाकीमधून निघाले होते, समोरून एक कंटेनर उजव्या लेनमधून चालला होता. मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला. ज्यामुळे गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी जबर बसली की यात गिरनार यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.