Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रत्नागिरी : दहावीच्या विद्यार्थीनीशी अश्लील वर्तन :, पालकांनी काढले झोडपून

रत्नागिरी : दहावीच्या विद्यार्थीनीशी अश्लील वर्तन :, पालकांनी काढले झोडपून 


रत्नागिरी : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची छेडछाड काढल्याप्रकरणी पालकांनी शिक्षकाला चोप दिल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडला आहे. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत सदर प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी नराधम शिक्षकास ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणात पीडित मुलीचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेण्यात आला आहे.

मुलीने तिच्या पालकांना शिक्षकाच्या या अश्लील कृत्याची माहिती दिल्यानंतर पालकांनी थेट शाळा गाठली आणि शिक्षकाला चोपला. यावेळी त्या शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरंही देण्याचा प्रयत्न केला. मात्र राग अनावर झालेल्या पालकांनी त्या शिक्षकाला मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणात कंत्राटी तत्वावर असलेल्या शिक्षकाला शाळेनं त्वरित निलंबन केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. छेडछाड केलेल्या विद्यार्थीनीच्या पालकांनी शाळेत जात संबंधित शिक्षकाला जाब विचारत त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पोलिस आणि संस्थेचे सदस्य देखील शाळेत दाखल झाले. याप्रकरणी चौकशीसाठी काही मुलींचे जबाब देखील पोलिसांकडून नोंदवले जाणार आहेत.

शिपायाने पालकांवर हात उचलला
मुलीची छेड काढल्यानंतर पालकांनी शिक्षकाला जाब विचारला. पण शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर मात्र मुलीच्या पालकांनी त्याच्या कानशिलात लावली. पण त्याचवेळी शिक्षकाच्या बाजूला उभ्या सलेल्या शिपायाने पालकावरच हात उचलल्याचा प्रकार घडला. शिपायाने पालकांवर हात उचलल्यानंतर मात्र पालक अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 
 
पीडित मुलीच्या पालकांनी आणि काही मुलींनी त्या शिपायाला मारहाण केली. संस्था चालक आणि इतर शिक्षकांनी यामध्ये मध्यस्ती केली. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. पीडित मुलीसोबत शाळेतील इतर काही मुलींचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. संबंधित शिक्षक हा संस्थेमध्ये कंत्राटी तत्वावर होता. त्याला आता निलंबित करण्यात आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.