Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी

साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
 

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडात आहे, दुसरीकडे आयुक्त जी श्रीकांत  यांच्या बंगल्यावर दीड वर्षात तब्बल 14.45 लाख रुपयांच्या घरगुती वस्तू खरेदी केल्या आहेत.

अगदी विमबार, साबण, गुड नाईट लिक्विडपासून 8 हजाराची डस्टबिनपर्यंत खरेदी करण्यात आले आहेत. झाडू आणि चमचे देखील सरकारी तिजोरीतून खरेदी कार्यात आले आहे. हा प्रकार आमदार प्रशांत बंब यांनी मागवलेल्या माहितीतून उघडकीस आला आहे. याबाबत आमदार प्रश्नात बंब म्हणाले की, झाडू, चमचे, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण, हिट, कपडे धुण्याची पावडर, चाकू इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. सात गालीचे प्रत्येक गालिच्याची किंमत 9800 रुपये, पाच डोअर मॅट ज्याची प्रत्येकी किंमत 2400 रुपये आहे. डस्टबिन दोन ज्याची किंमत 7995 रुपये आहे. 3190 किमतीचे कपचे दोन सेट घेण्यात आले. 7999 बेडशीट किमतीच्या 2 बेडशीट, अठरा हजार आठशे पन्नास किमतीच्या 3 बेडशीट, 7850 किमतीच्या दोन बेडशीट, 1250 रुपयांचे सहा टॉवेल, 9400 चे 2 डिनर सेट, अशी खरेदी मागील दीड वर्षात असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलाय. ही खरेदी कुठलेही टेंडर न काढत करण्यात आली आहे, असेही प्रशांत बंब यांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांची प्रतिक्रिया

याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, त्यावेळी मी नव्हतो. या वस्तू मी मागवलेल्या नाहीत. ज्यांनी कोणी ही खरेदी केली आहे. त्यांची चौकशी करणार आहे. जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त जी श्रीकांत यांनी म्हटले आहे.

वस्तू मागवल्या कोणी?
एकीकडे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. छोट्या-छोट्या वस्तू मागवण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाही. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा हक्काचा निधी देण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसा नाही. सेवानिवृत्त अधिकारी निधी मिळण्यासाठी महानगरपालिकेत चकरा मारत आहेत. एकीकडे असे चित्र असताना इतक्या मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या तिजोरीतून खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या दालनावर देखील कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्तांनी या वस्तू मागवलेल्या नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केल्याने या वस्तू नेमक्या कोणी मागवल्या? याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.