🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात हॉटेलमध्ये केवळ रोटीवरून तुफान हाणामारी; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

कोल्हापुरात हॉटेलमध्ये केवळ रोटीवरून तुफान हाणामारी; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
 

कोल्हापुरात ताटाला रोटी पाहिजे, या कारणावरून झालेल्या वादात एका हॉटेलमध्ये तिघांना मारहाण झाल्याची घटना घडली. मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हॉटेलमध्ये ११ जणांकडून धुडगूस घालून साहित्याची मोडतोड करण्यात आली. संपूर्ण हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी रमेश माळगे, आकाश कांबळे, अतुल कांबळे, अजय जगदाळे, रोहित जाधव, गणेशकुमार कांबळे, राजू कांबळे, समीर कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.