Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्व पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही अनिवार्य; विभागीय आयुक्तांचे निर्देश

सर्व पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही अनिवार्य; विभागीय आयुक्तांचे निर्देश
 

नागपूर विभागातील सर्व पोलिस स्टेशन सीसी टीव्ही कॅमेराच्या सर्वेलन्समध्ये असणे अनिवार्य असून जनतेलाही यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. पोलिस स्टेशनच्या परिसरात सीसीटीव्हीसंदर्भात माहिती फलक लावावा, तसेच या यंत्रणेचा वापर योग्य पद्धतीने व्हावा, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

नागपूर विभागातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून याचा सुयोग्य वापर होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व सीसी टीव्ही कार्यान्वित असावेत, अशी सूचना बिदरी यांनी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. जिल्हास्तरीय पर्यवेक्षण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी बिदरी बोलत होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, सहआयुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा पोलिस स्टेशन सीसीटीव्ही

नागपूर शहर ३३ ४९५

नागपूर ग्रामीण २२ २२०

भंडारा १७ १९६

चंद्रपूर २८ ३५४

गोंदिया १६ १६०

गडचिरोली १६ १६०

वर्धा १९ १९०


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.