सरपंच खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडण्याची शक्यता नाही; आमदाराचं मोठं विधान, इतिहासाचा दाखला
संतोष देशमुख खून प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अद्यापही फरार आहे. बीड पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढूनसुद्धा आरोपी मिळत नाहीये. कृष्णा आंधळे असं खून प्रकरणातल्या फरार आरोपीचं नाव आहे. त्याचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी
होत आहे. सरपंच खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर
सांगळे, प्रतिक घुले, केदार हे अटकेत आहेत. कृष्णा आंधळे मात्र अद्यापही
फरार आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराड हा स्वतःहून सरेंडर झाला होता. तर इतर
आरोपींच्या अटकेबाबतही संशय निर्माण झालेला होता. अटक झालेले आरोपीसुद्धा
सुद्धाहून सरेंडर झाले, असा संशय आहे.
त्यातच आता कृष्णा आंधळे पोलिसांनी मिळत
नाही. खून होऊन दीड महिना लोटला तरीही आरोपी मिळत नसल्यानं संशय निर्माण
झाला आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोपी
मिळण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे
यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
कृष्णा आंधळे सापडेल असं मला वाटत नाही. त्या भागात (परळी, केज) जेकाही घडतं, जो काही इतिहास आहे.. त्यावरुन असंच वाटतंय. आजवरचा इतिहास तसाच आहे. तो सापडायचा असता तर मागेच सापडला असता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमच्यासह देशमुख कुटुंबिय, मस्साजोगचे गावकरी करीत आहेत.तपास यंत्रणेवर दबाव येतोय, हे सिद्ध होत आहे. मागच्या काही दिवसांतले सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्डिंग्स बघितल्यावर स्पष्ट होत आहे. वाल्मिक कराडचे आणखी भरपूर प्रकरणं पुढे येणार आहेत. संतोष देशमुख खून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चाललं पाहिजे खुनाच्या बारा तासांमध्ये कोणी कोणाला किती फोन केले, याचं सीडीआर काढलं पाहिजे त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा गरजेचा आहे. तरच प्रशासन आणि तपास यंत्रणा मोकळा श्वास घेतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.